नवीन वर्षात रेल्वेचं तिकीट महागणार, पाहा नवीन तिकीट दर

भारतीय रेल्वेने गाड्यांच्या तिकीट दरात वाढ केली आहे. हे नवे दर उद्यापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

Indian Railway increse the ticket fare, नवीन वर्षात रेल्वेचं तिकीट महागणार, पाहा नवीन तिकीट दर

नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वच सज्ज झालो आहोत. अनेकांनी नवीन वर्षात काय काय करायचं याचं प्लॅनिंगही सुरु झालं असेल. काहींनी नवीन वर्षात कुठे कुठे फिरायला जायचं याची यादीही तयार केली असेल. मात्र, नीवन वर्षात तुमच्या या प्लॅनिंगला रेल्वे तिकीटवाढीचं ग्रहण लागणार आहे. कारण, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या तिकीट दरात वाढ केली आहे. हे नवे दर उद्यापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

नव्या वाढीव दरामुळे दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ होणार आहे. रेल्वेने 4 पैसे प्रति किलोमीटर प्रवासी भाड्यात वाढ केली आहे.

रेव्लेने मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांमध्ये 2 पैसे प्रति किलोमीटर आणि एसी गाड्यांसाठी 4 पैसे प्रति किलोमीटरने वाढ केली आहे.

रेल्वेचे वाढलेलं तिकीट भाडं

सामान्य नॉन एसीचं भाडं

सेकंड क्लास ऑर्डिनरी : 1 पैसा प्रति किलोमीटर

स्लीपर क्लास ऑर्डिनरी : 1 पैसा प्रति किलोमीटर

फर्स्ट क्लास ऑर्डिनरी : 1 पैसा प्रति किलोमीटर

मेल/एक्सप्रेस नॉन एसीचं भाडं

सेकंड क्लास (मेल/एक्सप्रेस) : 2 पैसे प्रति किलोमीटर

स्लीपर क्लास (मेल/एक्सप्रेस) : 2 पैसे प्रति किलोमीटर

फर्स्ट क्लास (मेल/एक्सप्रेस) : 2 पैसे प्रति किलोमीटर

एसी क्लासचं भाडं

एसी चेयर कार : 4 पैसे प्रति किलोमीटर

एसी 3-टियर/3E : 4 पैसे प्रति किलोमीटर

एसी 2-टियर : 4 पैसे प्रति किलोमीटर

एसी फर्स्ट क्लास/इकॉनोमी क्लास/EA : 4 पैसे प्रति किलोमीटर

मात्र, उपनगरातील रेल्वे सेवा आणि सीझन टिकीट दरात काहीही बदल झालेला नाही.

Indian Railway increse the ticket fare

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *