ट्रम्प यांचा जावई भारतात, सुरक्षेसाठी अमेरिकन कमांडोंची फौज

  • Sachin Patil
  • Published On - 13:03 PM, 23 Nov 2018
ट्रम्प यांचा जावई भारतात, सुरक्षेसाठी अमेरिकन कमांडोंची फौज

जैसलमेर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा जावई जारेड कुशनर हे सध्या भारतात आलेले आहेत. अमेरिकेत व्यवसाय करत असलेल्या आपल्या भारतीय मित्राच्या लग्नासाठी ते राजस्थानच्या जैसलमेर येथे आलेले आहेत. जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या राष्ट्रपतीचा जावई आला असल्याने जैसलमेरला सुरक्षा छावनीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. जावयाच्या सुरक्षेसाठी 50 अमेरीकी कमांडो जैसलमेरला आलेले आहेत. कुशनर पोहोचायच्या आधीच हे 50 कमांडो जैसलमेरला पोहोचले होते. त्यांनी कुशनर आल्यावर जैसलमेर विमानतळ खाली करवून घेतले आणि चोख सुरक्षा बंदोबस्तात कुशनर यांना होटेलपर्यंत पोहोचवले.

जारेड कुशनर ट्रंपची मुलगी इवांका हिचे पती आहेत. इवांका ही सुद्धा कुशनर सोबत जैसलमेरला येणार होती पण कुशनर गुरुवारी एकटेच आले. अमेरीकेहून आलेले 50 कमांडो हे कुशनरच्या यायच्या तीन दिवसांआधी जेसलमेरला आले आणि त्यांनी कुशनरच्या सुरक्षा व्यवस्थेची संपुर्ण तयारी केली.

कुशनर हे रिअल स्टेट व्यावसायिक आहेत. ते लग्नात सहभागी होण्यासोबतच जैसलमेरच्या प्रसिद्ध स्थळांना भेट देणार आहेत. ते 22-25 नोव्हेंबर दरम्यान जैसलमेरमध्ये रहातील.

कुशनर यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस दल आणि अत्याधुनिक शस्त्रांसोबत प्रशिक्षीत कमांडो तैनात करण्यात आले आहेत. असे जैसलमेर पोलीस अधिक्षक चंद्र शर्मा यांनी सांगितले.