दहशतवाद्याकडून बदला घेण्यासाठी शहीद जवान औरंगजेबचे दोन्ही भाऊ सैन्यात

शहीद जवान औरंगजेब यांचे दोन्ही लहान भाऊ भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर अशी या दोन भावांची नावं आहेत.

दहशतवाद्याकडून बदला घेण्यासाठी शहीद जवान औरंगजेबचे दोन्ही भाऊ सैन्यात

श्रीनगर: शहीद जवान औरंगजेब यांचे दोन्ही लहान भाऊ भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर अशी या दोन भावांची नावं आहेत. जम्मू-काश्मीरमधील रोजोरी येथे झालेल्या परेडमध्ये त्यांनी अधिकृतरित्या सैन्यात प्रवेश केला. मागील वर्षी औरंगजेब ईदसाठी घरी जात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करुन हत्या केली होती.


कुटुंबावर झालेल्या या आघातानंतरही शहीद जवान औरंगजेब यांचे लहान भाऊ मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या देशसेवेची ओतप्रोत भावनाच दिसत आहे. मुलांच्या या निर्णयानंतर औरंगजेब यांचे वडील म्हणाले, ‘माझ्या मुलाचा लढता-लढता मृत्यू झाला असता तर दुःख झाले नसते, पण दहशतवाद्यांनी माझ्या मुलाचे अपहरण करुन कपटाने हत्या केली. माझ्या दोन्ही मुलांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतल्याने माझी छाती अभिमानाने फुगली आहे. तरिही माझ्या छातीवर मुलाच्या हत्येच्या जखमा आहेत. मी स्वतः त्या दहशतवाद्यांना मारावे, असे वाटते. मात्र, आता माझ्या मुलाच्या हत्येचा बदला माझे हे दोन मुलं घेतील.”

औरंगजेब यांचा छोटा भाऊ मोहम्मद तारिकने देखील देशासाठी प्राण देण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले. मोहम्मद तारिक म्हणाला, “आम्ही देखील भावाप्रमाणेच रेजिमेंटचं नाव रोषण करु. आम्ही चांगलं काम करु आणि देशासाठी प्राण अर्पण करण्यासही मागे हटणार नाही.”

औरंगजेब यांचा दुसरा भाऊ शब्बीर म्हणाला, “मी भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सैन्यात दाखल झालो आहे. मी भावाचं आणि पंजाब रेजिमेंट दोघांचंही नाव रोषण करेल.”

राजोरी येथे सोमवारी भारतीय सैन्यात 100 नव्या सैनिकांची भरती करण्यात आली. यात औरंगजेबच्या दोन्ही भावांचाही समावेश होता. शहीद जवान औरंगजेब यांना देशसेवेचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. वडिल मोहम्मद हनीफ देखील सैनिक होते. औरंगजेब यांच्या दोन्ही भावांची भरती पंजाब रेजिमेंटमध्ये झाली आहे. या भरतीसाठी परीक्षेत काश्मीरमधील 11,000 तरुण सहभागी झाले होते. त्यातील 100 जणांची भरती झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *