Jharkhand : झारखंडमध्ये त्रिकूट रोपवेचा अपघात, 48 जण हवेत अडकलेत; लष्कराला बचाव कार्यात अडचणी

झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत.

Jharkhand : झारखंडमध्ये त्रिकूट रोपवेचा अपघात, 48 जण हवेत अडकलेत; लष्कराला बचाव कार्यात अडचणी
झारखंडमध्ये त्रिकूट रोपवेचा अपघातImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:51 PM

झारखंड – झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केले. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आले नाही. झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृ्त्यू आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

दोन ट्रॉल्या एकमेकांना धडकल्या

रविवारी रामनवमीनिमित्त शेकडो पर्यटक येथे पूजा करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी दाखल झाले होते. रोपवेची एक ट्रॉली खाली येत होती.त्यावेळी वरती जाणारी ट्रॉली धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले आहेत. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे 24 ट्रॉल्या हवेत होत्या. घाईघाईत अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

20 तास उलटले तरी अजून 48 जण हवेत

अपघात होऊन 20 तास उलटले तरी अजून 48 जण हवेत लटकले आहेत. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले. परंतु हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे 18 ट्रॉली हलू लागल्या आहेत. त्यामध्ये ट्रॉलीत असलेल्या लोकांच्या जीवावर बेतले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे

रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तासाभराच्या प्रयत्नानंतरही बचाव पथकाला यश मिळालेले नाही. हेलिकॉप्टरमधून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अडकलेल्या लोकांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे. ट्रॉलीमध्ये लहान मुले, पुरुष आणि काही महिला अडकल्या आहेत. यासोबतच मार्गदर्शक आणि छायाचित्रकारही अडकले आहेत.’सध्या रोप वे बंद आहे, ट्रॉलीच्या प्रदर्शनामुळे हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एनडीआरएफसह लष्कराची मदत घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करू नका अशी माहिती जिल्हाधिकारी मंजुनाथ भाईजंत्री यांनी दिली.

Jayant Patil: हिशोबच मांडायचाय तर उद्धव ठाकरे मोदींकडे मांडतील, हिशोबावरून जयंत पाटील आणि दानवेंमध्ये जुंपली

नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला मागितली 15 लाखांची खंडणी

रामनवमीच्या मिरवणुकीवरून शहाद्यात कडकडीत बंद; शहरात मोठा फौजफाटा दाखल

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....