VIDEO : रानू मंडलनंतर आता उबर चालकाचं गाणं व्हायरल

उत्तर प्रदेशच्या एका उबर चालकाचा (Uber Driver) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या उबर चालकाचा आवाज ऐकून अनेकजण त्याचे कौतुक करत आहे. तर रानू मंडललाही (Ranu mandal) विसरुन जाऊ, असा आवाज या चालकाचा आहे.

VIDEO : रानू मंडलनंतर आता उबर चालकाचं गाणं व्हायरल

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या एका उबर चालकाचा (Uber Driver) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या उबर चालकाचा आवाज ऐकून अनेकजण त्याचे कौतुक करत आहे. तर रानू मंडललाही (Ranu mandal) विसरुन जाऊ, असा आवाज या चालकाचा आहे. या व्हिडीओमध्ये उबर चालक (Uber Driver) आशिकी (Aashiqui)  चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘नजर के सामने’ गात आहे. हे गाणं गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी गायलं होते.

उबर चालक विनोदने एका माईकद्वारे हे गाणं गायलं आहे. सध्या हा 55 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी रानू मंडल एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर आता लखनऊच्या उबर चालकाचा या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

“विनोदसोबत माझी भेट लखनऊमध्ये झाली. तो एक उत्कृष्ट गायक आहे. मी त्यांना एक गाणं गाण्याची विनंती केली. तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता आणि विनोदला प्रसिद्धी देऊ शकता. त्याचा स्वत:चा यूट्यूब चॅनलही आहे”, असं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केलेल्या युजरने सांगितले.

हा व्हिडीओ ट्विटरवर 14 सप्टेंबर रोजी पोस्ट केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 9 हजार लोकांनी पाहिला आहे. 700 लोकांनी लाईक आणि 300 पेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *