VIDEO: भरधाव गाडीनं फुटपाथवर झोपलेल्या मुलांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

बिहारची राजधानी पाटणा येथे भरधाव गाडीने फुटपाथवर झोपलेल्या मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी (25 जून) भरधाव एसयूव्ही (SUV) फुटपाथवर चढल्याने हा अपघात झाला.

VIDEO: भरधाव गाडीनं फुटपाथवर झोपलेल्या मुलांना चिरडलं, तिघांचा जागीच मृत्यू

पाटणा: बिहारची राजधानी पाटणा येथे भरधाव गाडीने फुटपाथवर झोपलेल्या मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी (25 जून) भरधाव एसयूव्ही (SUV) फुटपाथवर चढल्याने हा अपघात झाला. यात 3 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा पाय मोडला. या अपघातात गाडी चालकही गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान चालकाचाही मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसयूव्ही  गाडीतील एकजण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यासह जखमींना नालंदा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर संतप्त लोकांनी गाडीचे टायर जाळत रस्ता अडवला. चालकाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेला नाही, तर अपघातात गंभीर जखमी झाल्याने झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले.

संबंधित गाडी चालक नशेत असल्याने त्याने फुटपाथवर गाडी चढवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. मुलांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी असे काहीही झालेले नसल्याचे म्हटले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *