कोरोनाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यालाच संसर्ग, केंद्रीय आरोग्य विभागाच्या सहसचिवांना कोरोना

देशातील कोरोना परिस्थितीची इत्यंभूत माहिती देणारे केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे (Union Health Ministry Joint Secretary Lav Agarwal tested Corona positive).

कोरोनाची इत्यंभूत माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यालाच संसर्ग, केंद्रीय आरोग्य विभागाच्या सहसचिवांना कोरोना

नवी दिल्ली :  देशातील कोरोना परिस्थितीची प्रसारमाध्यमांसमोर इत्यंभूत माहिती देणारे केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबबत ट्विटरवर माहिती दिली आहे (Union Health Ministry Joint Secretary Lav Agarwal tested Corona positive).

“माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मी काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे”, असं लव अग्रवाल म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपले मित्र आणि सहकाऱ्यांनादेखील आयसोलेशनमध्ये जाण्याची विनंती केली आहे (Union Health Ministry Joint Secretary Lav Agarwal tested Corona positive).

लव अग्रवाल गेल्या चार महिन्यांपासून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड काम करत आहेत. भारतात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा दररोज कोरोनाबाबतची इत्यंभूत माहिती अग्रवाल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून द्यायचे. केंद्र सरकारचे आरोग्य पथक काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. या आरोग्य पथकात अग्रवाल हे महत्वाचे अधिकारी होते.

हेही वाचा : S P Balasubrahmanyam | गायक बालासुब्रमण्यम यांना कोरोना, प्रकृती चिंताजनक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचं लव अग्रवाल यांनी कौतुक केलं होतं. त्याचबरोबर मुंबईतून लवकरच कोरोना हद्दपार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर महिन्याभरानंतर मुंबईतील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली.

देशातील दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण

देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी आता कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.

कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *