नवी दिल्लीः दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन रुग्णालयांना भेट दिली असून, ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्यांचीही भेट घेतलीय. (Union Home Minister Amit Shah visits two hospitals)
दिल्ली बॉर्डरवर कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जखमी जवानांना भेटण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी हिंसक टॅक्टर रॅलीबाबत 25 हून अधिक एफआयआरमध्ये 37हून जास्त शेतकरी नेत्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
Union Home Minister Amit Shah (file photo) to visit two hospitals where police personnel injured in the violence during farmers’ tractor rally on January 26 have been admitted in north Delhi. pic.twitter.com/dR1m1ZskBq
— ANI (@ANI) January 28, 2021
या प्रकरणात आतापर्यंत 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय. तर 19 लोकांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आमच्याशी विश्वासघात केल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय. नोएडा चिल्ला बॉर्डर आणि एनएच 24 रिकामी केल्यानंतर सिंघू बॉर्डरवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. सिंघू बॉर्डरवर वाहनांना जाण्यापासून रोखण्यात आलंय. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात आलंय.
काल मंगळवारी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला.
संबंधित बातम्या
दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल
Union Home Minister Amit Shah visits two hospitals