केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला असून, नाईक यांना गंभीर दुखापत झालीय

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:51 PM, 11 Jan 2021
shripad naik

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, नाईक यांना गंभीर दुखापत झालीय. तसेच त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे ही घटना घडलीय. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी पलटी झाली. या रोड अपघातात मंत्री श्रीपाद नाईक गंभीर जखमी झालेत, तर त्यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. ते उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. (Union Minister Shripad Naik car crashes; Wife died on the spot)

नाईक हे माजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राहिले आहेत. अपघातानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ येथे हा अपघात झाला. नाईक आपल्या पत्नीसमवेत कुठेतरी जात होते, त्याचदरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांची पत्नी बराच काळ बेशुद्ध राहिली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोव्यात उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केलाय. श्रीपाद नाईक आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी आणि संरक्षण राज्यमंत्री आहेत.

कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून जात असताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितले जातेय. श्रीपाद नाईक यांच्यासह इतर तीन जण किरकोळ जखमी झालेत. श्रीपाद नाईक हे गोव्यातील मोठं नाव आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जवळच्यांपैकीच ते एक आहेत. मनोहर पर्रीकरांनंतर गोव्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. श्रीपाद नाईक यांचे स्वीय सचिव दीपक यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. अंकोलाहून यल्लापूर मार्गे गोकर्णला जात होते. होसाकंबी गावाजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक कर्नाटकातील अंकोल्याहून गोव्यातील बंबोलीम येथील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवले.


संबंधित बातम्या 

Pune Accident | सोमवार की अपघातवार; पुण्यात एकापाठोपाठ चार अपघात