Mission Shakti : ... तर 2014 मध्येच आपण यशस्वी झालो असतो : माजी DRDO प्रमुख

Mission Shakti(ASAT) नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला. हा एक राजकीय निर्णय असल्याचं म्हणत माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण …

Mission Shakti : ... तर 2014 मध्येच आपण यशस्वी झालो असतो : माजी DRDO प्रमुख

Mission Shakti(ASAT) नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला. हा एक राजकीय निर्णय असल्याचं म्हणत माजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.

दुसरीकडे यासाठी डीआरडीओने परवानगी मागितली तेव्हाच हिरवा कंदील मिळाला असता, तर भारताने कदाचित पाच वर्षांपूर्वीच ही कामगिरी केली असती. डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी याबाबत माहिती दिली. तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सुरक्षा समितीला आम्ही ए-सॅटबाबत सादरीकरण केलं होतं. त्यांनी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, पण दुर्दैवाने आम्हाला त्यांच्याकडून (यूपीए सरकार) सकारात्मक प्रतिसाद मिळाल नाही. त्यामुळे आम्हाला काहीही करता आलं नाही, असंही सारस्वत म्हणाले.

डॉ. सतिश रेड्डी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला, तेव्हा त्यांनी धैर्य दाखवलं आणि कामाला लागा म्हणून सूचना दिल्या. जर यासाठी 2012-13 मध्ये परवानगी मिळाली असती, तर कदाचित ही कामगिरी 2014-15 मध्येच करता आली असती, असंही सारस्वत यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींचा शास्त्रज्ञांशी संवाद

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *