...फक्त युपी पोलीस महासंचालकांच्या रिटायरमेन्टला निघते 'ही' गाडी!

उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक ओपी सिंह हे शुक्रवारी (31 जानेवारी) निवृत्त झाले. या प्रसंगी पोलीस विभागाकडून लखनऊ पोलीस लाईनवर दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

...फक्त युपी पोलीस महासंचालकांच्या रिटायरमेन्टला निघते 'ही' गाडी!

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक ओपी सिंह हे शुक्रवारी (31 जानेवारी) निवृत्त झाले. या प्रसंगी पोलीस विभागाकडून लखनऊ पोलीस लाईनवर दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परेडही घेण्यात आली, त्यासोबतच डॉज किंग्सवे विंटेज कारमध्ये (Dodge Kingsway Vintage Car) बसवून महासंचालकांना निरोप देण्यात आला. या विंटेज कारचा एक वेगळा इतिहास आहे. ही कार फक्त महासंचालकांना निरोप देण्यासाठी काढली जाते (Dodge Kingsway Vintage Car).

किंग्सवे डॉज नावाची ही गाडी क्रिसलर कॉरपोरेट कंपनीने बनवली होती. 29 नोव्हेंबर 1956 ला या गाडीला वरिष्ठ पोलीस अधीक्षक लखनऊच्या नावे विकत घेण्यात आलं होतं. त्याकाळी या गाडीची किंमत 61,063.81 रुपये होती. आज ही गाडी लखनऊ महासंचालकांच्या नावावर आहे (Dodge Kingsway Vintage Car).

 

 

राज्य पोलीस मोटार वाहन अधिकारी सीतापूर येथून ही गाडी खरेदी करुन घेऊन आले होते आणि या गाडीला तेव्हाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना सोपवण्यात आलं. त्यानंतर ही गाडी पोलीस महानिरीक्षकांच्या सेवेत देण्यात आली. पुढे जाऊन पोलीस महानिरीक्षकांचं पद बदलून पोलीस महासंचालक झालं.

एकमेव मेकॅनिक

ही गाडी इतकी स्पेशल आहे की, पूर्ण लखनऊमध्ये या गाडीची सर्व्हिस करणारा फक्त एकच व्यक्ती होता. काही वर्षांपूर्वी त्या मेकॅनिकचा मृत्यू झाला.

 

 

तीन गिअर असलेल्या निवडक गाड्यांपैकी एक

डॉज किंग्सवे कारची लांबी 481.3 सेंटीमीटर, रुंदी 186.4 सेंटीमीटर आणि उंची 161.6 सेंटीमीटर आहे. 3600cc आणि 6 सिलेंडर असलेली ही कार आजच्या टोयोटा फॉर्च्युनर, क्रिस्टा, टाटा सफारीपेक्षाही लांबीला जास्त आहे. त्याशिवाय, या गाडीचा गिअर बॉक्स अत्यंत विशेष आहे. ही गाडी तीन गिअर असलेल्या निवडक गाड्यांपैकी एक आहे.

ही गाडी उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक निवृत्त झाल्यावर त्यांना निरोप देण्यासाठी काढली जाते. या गाडीला सजवलं जातं. त्यापूर्वी गाडीला चालवून बघितलं जातं, जेणेकरुन कार्यक्रमावेळी त्यात काही खराबी येऊ नये. त्यानंतर महासंचालकांना या गाडीमध्ये बसवून ती चालवली जाते. तसेच, यावेळी परेडही होते. हिच परंपरा ओपी सिंह यांना निरोप देतानाही पाळण्यात आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *