VIDEO: रुग्णालयात फक्त 3 तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक; मृत्यूशी लढणाऱ्या आप आमदाराची आर्त हाक

दिल्लीत ऑक्सिजनच्या असलेल्या तुटवड्यावर बोट ठेवत आम आदमी पार्टीचे (आप) आमदार सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. aap mla saurabh bhardwaj

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:56 PM, 22 Apr 2021
VIDEO: रुग्णालयात फक्त 3 तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक; मृत्यूशी लढणाऱ्या आप आमदाराची आर्त हाक
aap mla saurabh bhardwaj

नवी दिल्लीः देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनानं दिल्लीतील परिस्थितीही प्रचंड बिघडलीय. दिल्लीतील रुग्णालयात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासतेय. दिल्लीत ऑक्सिजनच्या असलेल्या तुटवड्यावर बोट ठेवत आम आदमी पार्टीचे (App) आमदार सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओ ते ऑक्सिजन मास्क घालून आणि दीर्घ श्वास घेताना पाहायला मिळतायत.(Oxygen Balance In Hospital For Only 3 Hours; Call For AAP MLA Saurabh Bhardwaj Who Is Fighting Against Death)

केंद्र आणि हरियाणा सरकारला ऑक्सिजन देण्याचे आवाहन

व्हिडीओमध्ये भावनिक आवाहन करीत त्यांनी केंद्र आणि हरियाणा सरकारला ऑक्सिजन देण्याचे आवाहन केलेय. आता एकमेकांचा पाय खेचण्याची वेळ नाही, तर एकत्र काम करण्याची वेळ आलीय, असंही सौरभ भारद्वाज यांनी सांगितलंय. सौरभ भारद्वाज यांना तीन-चार दिवसांपूर्वी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांनी ऑक्सिजन मास्क घातलेला आणि श्वासोच्छवासासाठी झगडत असल्याचे दिसून आले. भारद्वाज म्हणाले की, ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, तेथे फक्त तीन तासांचा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे.

फक्त तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक

“मला ज्या रुग्णालयात दाखल केले आहे, त्यात फक्त तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन आहे. जेव्हा जेव्हा मी हा मास्क काढला, तेव्हा मला पोहायला येत नसताना तलावात ढकलल्यासारखं वाटतंय आणि श्वासोच्छवासासाठी जबरदस्ती केली जात आहे.” भारद्वाज यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मी ऑक्सिजन घेणे थांबवू नये म्हणून केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला अपील करेन. बरेच लोक ऑक्सिजनवर अवलंबून आहेत आणि ऑक्सिजनशिवाय, पाण्याच्या अभावामुळे मासे मरतात, त्याच प्रकारे हे लोक मरतील. प्रत्येकाने एकमेकांचे पाय खेचण्याची नव्हे, एकत्र काम करण्याची वेळ आलीय.

राजधानीच्या अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, राजधानीच्या अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. सरोज, राठी, शांती मुकुंद, तीरथ राम हॉस्पिटल, यूके हॉस्पिटल, जीवन हॉस्पिटलनंही ऑक्सिजन साठा संपल्याचं सांगितलंय. आम्ही त्यांना एखाद्या मार्गाने ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या दिल्लीतील बर्‍याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे तीव्र संकट आहे. काहींमध्ये ऑक्सिजन पूर्णपणे संपलाय, मला सकाळपासूनच रुग्णालयांकडून मेसेज आणि ईमेल येत आहेत. आम्ही काही प्रमाणात त्यांना इतर रुग्णालयांकडून मागवून ऑक्सिजन साठा देत आहोत. ज्यात थोडासा साठा आहे, तेथे सिलिंडर उपलब्ध करून देत आहोत. aap mla saurabh bhardwaj seen fighting for breath said just 3 hours oxygen left in the hospital

संबंधित बातम्या

आम्ही ह्या पापी समाजाचे घटक आहोत, रुग्णांसाठी काहीच करु शकत नसल्याची लाज वाटते, खंडपीठाची टिप्पणी

पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची लागण, रामदेव बाबांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता

Oxygen Balance In Hospital For Only 3 Hours; Call For AAP MLA Saurabh Bhardwaj Who Is Fighting Against Death