जेटप्रमाणेच बँकांनी मलाही मदत करायला हवी होती : विजय मल्ल्या

मुंबई : भारतीय बँकांनी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशातून पळालेल्या विजय मल्ल्याने जेट एअरवेजच्या मदत पॅकेजवरुन सरकारला घेरलं. त्याने एनडीए सरकार आणि सरकारी बँकांवर दुजाभाव करण्याचा आरोप लावला. आर्थिक अडचणीत अडकलेल्या जेट एअरवेजला वाचवण्यासाठी भारतीय स्टेट बँक कंपनीची मदत करत आहे. त्यावर आक्षेप घेत मल्ल्याने ट्विटरवरुन सरकारवर आणि बँकेवर अनेक आरोप केले. …

जेटप्रमाणेच बँकांनी मलाही मदत करायला हवी होती : विजय मल्ल्या

मुंबई : भारतीय बँकांनी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशातून पळालेल्या विजय मल्ल्याने जेट एअरवेजच्या मदत पॅकेजवरुन सरकारला घेरलं. त्याने एनडीए सरकार आणि सरकारी बँकांवर दुजाभाव करण्याचा आरोप लावला. आर्थिक अडचणीत अडकलेल्या जेट एअरवेजला वाचवण्यासाठी भारतीय स्टेट बँक कंपनीची मदत करत आहे. त्यावर आक्षेप घेत मल्ल्याने ट्विटरवरुन सरकारवर आणि बँकेवर अनेक आरोप केले. “किंगफिशरसाठीही असं व्हावं अशी माझी इच्छा होती.”

“सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नोकरी, संपर्क सुविधा आणि कंपनीला वाचवण्यासाठी जेट एअरवेजला मदतीचा हात दिला, हे बघून आनंद झाला”, असं मल्ल्या त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.


“याच बँकांनी देशातील सर्वोत्तम एअरलाईन्सबाबत असं केलं नाही, तिला बर्बाद होण्यासाठी सोडून दिलं. एनडीए सरकारचा हा दुजाभाव आहे”, किंगफिशर आणि जेट या कंपन्यांमध्ये दुजाभाव केल्याचा आरोप मल्ल्याने भाजप सरकारवर लावला. तर त्याने किंगफिशरला वाचवण्यासाठी चार हजार कोटी रुपये गुंतवल्याचंही सांगितलं.


“भाजपच्या प्रवक्त्यांनी मी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवलेल्या पत्रांच्या आधारे बँकांनी अवैध पद्धतीने किंगफिशरची मदत केल्याचा आरोप केला”, असेही मल्ल्या म्हणाला. तसेच, “मी पुन्हा सांगतो की, मी बँक आणि इतर कर्जदारांचं कर्ज फेडण्यासाठी माननीय कर्नाटक उच्च न्यायालयात चल संपत्ती ठेवणयाचा प्रस्ताव दिला. तो पैसा बँक का घेत नाही. यामुळे आणखी काही नाही तर जेट एअरवेजला वाचवण्यात मदत होईल”, असेही तो म्हणाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *