Violence in Bengal : बंगालमध्ये हिंसाचार, पंतप्रधान मोदींचा थेट राज्यपाल जगदीप धनखर यांना फोन; राज्यपाल म्हणाले…

या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागविलाय. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बंगालमध्ये येत आहेत आणि संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. pm narendra modi jagdeep dhankhar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:27 PM, 4 May 2021
Violence in Bengal : बंगालमध्ये हिंसाचार, पंतप्रधान मोदींचा थेट राज्यपाल जगदीप धनखर यांना फोन; राज्यपाल म्हणाले...
pm narendra modi

कोलकाता: पश्चिम बंगाल निवडणूक निकालाच्या घोषणेनंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आलाय. भाजप नेते सौमित्र अटांवर हल्ला करण्यात आलाय. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Governor Jagdeep Dhankhar) यांना फोन करून चिंता व्यक्त केलीय. या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागविलाय. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पश्चिम बंगालमध्ये येत आहेत आणि संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. (Violence In West Bengal Pm Narendra Modi Called Governor Jagdeep Dhankhar)

संवैधानिक मूल्यांशी केलेली तडजोड कधीही गृहित धरली जाऊ शकत नाहीत

यापूर्वी राज्यपालांनी मंगळवारी पोलीस महासंचालक (DG) पी. नीरजनयन आणि कोलकाता पोलीस (CP) चे आयुक्त सोमेन मित्र यांच्याकडून त्वरित अहवाल मागविलाय. मंगळवारी डीजी आणि सीपी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिलेय. असे असूनही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यपालांनी मंगळवारी ट्विट केले की, “अहवाल एक भीतिदायक परिस्थिती दर्शवितो. घाबरलेले लोक स्वत: चा बचाव करण्यासाठी पळत आहेत. हत्या आणि संहार घडवून आणला जात आहे. संवैधानिक मूल्यांशी केलेली तडजोड कधीही गृहित धरली जाऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही यंत्रणा तात्काळ हाताळली पाहिजे.

राज्यात हिंसाचार, तोडफोड, जाळपोळ, लूटमार आणि खून हे बिनधास्तपणे सुरू

राज्यपाल ट्विट करत म्हणाले की, “पंतप्रधानांनी फोन करून कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल गंभीरपणे चिंता व्यक्त केली असून, ही परिस्थिती चिंताजनक आहे.” मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे या गंभीर परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केलीय. राज्यात हिंसाचार, तोडफोड, जाळपोळ, लूटमार आणि खून हे बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे. ” या निवडणुकीच्या निकालाच्या 48 तासांनंतर झालेल्या हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात भाजपने 5 मे रोजी धरणे आंदोलन जाहीर केलेय. टीएमसीने हल्ल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळला असला तरी भाजप कार्यकर्त्यांवरील झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.

पंतप्रधानांनी स्टंट थांबवावेत आणि फोन करण्याऐवजी कोरोना लढ्यासाठी काम करावे

दुसरीकडे टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी असा दावा केला की, राज्यातील जनतेने भाजपला नाकारलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना फोन न करता राज्यपालांना फोन करत आहेत. ते राज्यातील जनतेच्या आदेशाचे पालन करत नसल्याचं स्पष्ट होतंय. दुसरीकडे टीएमसीचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधानांनी स्टंट थांबवावेत आणि फोन करण्याऐवजी कोरोना लढासाठी काम केले पाहिजे.

दंगलीनंतर भाजपचे राज्य सरकारवर आरोप, जेपी नड्डा नातेवाईकांची भेट घेणार

पश्चिम बंगालचा विधनासभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला आहे. मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार या हिंसाचारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये भाजप, तृणमूल तसेच आयएसएफ या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हा हिंसाचार उसळल्यानंतर केंद्रीय ग्रहमंत्रालयाने पश्चिम बंगालच्या सरकारला याबद्दलचा सविस्तर अहवाल मागितला आहे. तसेच बंगालमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बंगलाचा दोन दिवसांचा दौरा करण्याचे ठरवले आहे. यामध्ये ते हिंसाचारात जखमी झालेले भाजप कार्यकर्ते तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत. दरम्यान, बंगालमध्ये सध्या असलेली तणावाची स्थिती ही भाजप पक्षातील अंतर्गत लढाई असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला असून, प्रत्येकाने शांतता पाळण्याचे आवाहन तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

West Bengal CM 2021: ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड, 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

Vilence In Bengal : ‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प’, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

violence in bengal pm narendra modi called governor jagdeep dhankhar