VIDEO : नवस फेडणारी महिला हत्तीच्या पोटाखाली अडकली, सेल्फीने फसली

नवस फेडताना घेतलेला सेल्फी आणि झालेली अडचण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

, VIDEO : नवस फेडणारी महिला हत्तीच्या पोटाखाली अडकली, सेल्फीने फसली

मुंबई : सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवस फेडताना घेतलेला सेल्फी आणि झालेली अडचण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

मंदिराबाहेर हत्तीची दगडी मूर्ती आहे. एक महिला या छोट्या हत्तीच्या पोटाखालून जाण्याचा प्रयत्न करत आहे. बहुधा हा नवस फेडण्याचा प्रकार असावा. हत्ती छोटा आणि महिला थोडी धष्टपुष्ट आहे. महिलेने हत्तीच्या पोटाखालून तिचं निम्म शरीर पलिकडे नेलं. त्यानंतर त्याच पोझिशनमध्ये फोटोही काढले. मात्र त्यानंतर ती अडकून बसली. ना तिला पुढे जाता येत होतं ना मागे. बाजूच्या स्त्रीया तिला पुढे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर दोन महिलांनी हत्तीच्या पोटात अडकलेल्या या महिलेला खेचून बाहेर काढलं आणि अडकलेल्या महिलेसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पाहा व्हिडीओ 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *