Voter card Aadhar Link : मतदार यादी आणि आधारकार्डचं लिंकअप करणार, निवडणूक आयोगाची घोषणा

आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परषदेत ही माहिती दिलीय.

Voter card Aadhar Link : मतदार यादी आणि आधारकार्डचं लिंकअप करणार, निवडणूक आयोगाची घोषणा
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 5:43 PM

मुंबई : आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर आता मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक (Aadhar Voter card Link) करण्याचा नोठा निर्णय घेण्यात आलाय. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत. आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Election Commission) मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परषदेत ही माहिती दिलीय. देशपांडे यांना देशातील नागरिकांना 1 ऑगस्टपासून आपलं मतदान ओळखपत्र (Voter ID) आणि आधार कार्ड लिंक करण्याचं आवाहन केलं आहे.

श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक कायद्यात अलीकडे काही बदल झाले आहेत. हे सर्व बदल 1 ऑगस्ट 2022 पासून देशात लागू होतील. ही प्रक्रिया एप्रिल 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रक्रिये दरम्यान मतदारांनी योग्य माहिती देणं महत्वाचं आहे. यातील गोपनियता कुणी भंग केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कायद्याचं हे कठोर बंधन निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही लागू राहणार आहे.

कोणकोणते महत्वाचे बदल?

  1. पूर्वी 1 जानेवारी ही मतदार क्वालिफाईंगची तारीख होती. आता दर तीन महिन्याचा पहिला दिवस हा क्वालिफाईंग दिनांक असेल.
  2. पोस्टल मतदानात स्पाऊस हा शब्द वाढवला आहे. जो अधिकार पतीला तोच अधिकार आता पत्नीला असेल.
  3. मतदार यादीतील मतदारांचं आधार कार्डशी लिंकअप करण्यात येईल. आधार आणि मतदान कार्डाशी संबंधित सर्व सुविधा मतदारांना मिळाव्यात. आधारमुळे योग्य मतदान ओळखता येणार. आधार नसेल तर 11 पैकी एक कागदपत्र मतदाराला बाळगणं महत्वाचं असेल.

सर्व राजकीय पक्षांची आणि निवडणूक आयोगाची बैठक

दरम्यान, उद्या सर्व राजकीय पक्षांची आणि निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व बदलांची माहिती राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे. कोणताही आधार क्रमांक पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.