भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग, दोन्ही देशांकडून हालचाली वाढल्या!

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग तयार झाले आहेत. सीमेवरील 27 गावं भारत सरकारकडून खाली करण्यात आली असून, सुमारे 10 हजार सैनिकांचा ताफाही सीमेवर तैनात करण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांतील सर्वात कडक सुरक्षा सीमेवर तैनात करण्यात आली आहे. भारतीय सीमेवर पहिल्यांदाच सैनिकांच्या 100 कंपन्या दाखल झाल्या आहेत. तसेच, जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले …

भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग, दोन्ही देशांकडून हालचाली वाढल्या!

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग तयार झाले आहेत. सीमेवरील 27 गावं भारत सरकारकडून खाली करण्यात आली असून, सुमारे 10 हजार सैनिकांचा ताफाही सीमेवर तैनात करण्यात आला आहे. गेल्या तीन दशकांतील सर्वात कडक सुरक्षा सीमेवर तैनात करण्यात आली आहे.

भारतीय सीमेवर पहिल्यांदाच सैनिकांच्या 100 कंपन्या दाखल झाल्या आहेत. तसेच, जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले असून, राखीव सैनिकांनाही तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काश्मीरमधील नागरिकांना आवश्यक वस्तूंचा साठाही जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानाकडूनही सीमेवरील गावं हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला आणि यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद संघटना पाकिस्तानाच्या भूमीत वाढलेली असल्याने, सहाजिक भारतासह जगभरात पाकिस्तानविरोधात जगभर संतापाची लाट पसरली आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी भारतातून जोर धरु लागली.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या चार दिवसांनंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड काजी राशीद याचा खात्मा करण्यात आला. मात्र, या दहशतवादी संघटनांना पोसणाऱ्या पाकिस्तानलाही धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच सीमेवरील हालचाली वाढल्याने, आता दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग दिसू लागले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *