पुढील वर्षापासून बीएड कोर्स चार वर्षांचा, 1 वर्ष वाचणार: जावडेकर

नवी दिल्ली: शैक्षणिक कार्य आणि शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून बॅचलर इन एज्युकेशन अर्थात बीएडचा अभ्यासक्रम चार वर्षांचा (4 year integrated B.Ed course) करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash) यांनी याबाबतची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे बीएड करण्यासाठी ग्रॅज्युएशन अर्थात पदवीची गरज नसेल, तर बारावीनंतरच बीएडला […]

पुढील वर्षापासून बीएड कोर्स चार वर्षांचा, 1 वर्ष वाचणार: जावडेकर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

नवी दिल्ली: शैक्षणिक कार्य आणि शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून बॅचलर इन एज्युकेशन अर्थात बीएडचा अभ्यासक्रम चार वर्षांचा (4 year integrated B.Ed course) करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash) यांनी याबाबतची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे बीएड करण्यासाठी ग्रॅज्युएशन अर्थात पदवीची गरज नसेल, तर बारावीनंतरच बीएडला अॅडमिशन घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाचणार आहे.

दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय प्राचार्य संमेलन पार पडलं. या कार्यक्रमात जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना संबोधित केलं.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “आम्ही पुढील वर्षापासून बीएडचा चार वर्षांचा अभ्यासक्रम असलेला कोर्स सुरु करत आहोत. शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे काही बदल करण्यात येत आहेत. काही लोकांसाठी बीएड शेवटचा पर्याय असतो, मात्र हा पहिला पर्याय बनायला हवा. शैक्षणिक स्तर घसरत आहे. त्याचं कारण म्हणजे या क्षेत्रात येणारे लोक हे अन्य कोणता पर्याय उपलब्ध न झाल्याने येत आहेत. त्यामुळे सरकारने पुढील वर्षापासून चार वर्षांचा बीएड कोर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे”.

“बीएडच्या नव्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाचणार आहे. कारण बारावीनंतर यासाठी अॅडमिशन घेता येणार आहे. सध्याच्या नियमानुसार पदवी घेतल्यानंतर दोन वर्ष बीएड कोर्स करावा लागतो. त्यामुळे बारावीनंतरची तीन आणि बीएडची दोन अशी पाच वर्ष लागतात. मात्र आता बारावीनंतर थेट चार वर्षांचा बीएड कोर्स करता येणार आहे. त्यामुळे एक वर्ष वाचेल” असं जावडेकर म्हणाले.

शिकवण्याचं किंवा शिक्षकी पेशा ही पहिली पसंती असावी, काही मिळालं नाही किंवा अन्य कुठे करिअर होऊ न शकल्याने शिक्षक झाल्याने त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतो, असं जावडेकरांनी नमूद केलं.

नवा बीएड कोर्स हा तीन माध्यमे बीए, बीकॉम आणि बीएससीमध्ये करता येईल. नॅशनल काऊन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन अर्थात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यासाठीचा अभ्यासक्रम तयार करणार आहे.

कसा असेल चार वर्षांचा बीएड कोर्स?

  • बारावी झाल्यानंतर बीएडला अॅडमिशन घेता येईल
  • नवा कोर्स चार वर्षांचा असेल
  • बीए,बी कॉम आणि बी एससी या तीन विभागात कोर्स करता येईल
  • सध्या पदवीनंतर बीएडला अॅडमिशन घेता येतं, सध्याचा दोन वर्षांचा कोर्स आहे
  • नव्या नियमामुळे बारावीनंतर अॅडमिशन घेता येत असल्याने 1 वर्ष वाचणार आहे
  • नॅशनल काऊन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनद्वारे या नव्या कोर्सच्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाईल
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.