आम्हाला सरकारी सुविधा नको, वाजपेयींच्या मुलीचं पीएमओला पत्र

नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांची मानलेली मुलगी नमिता भट्टाचार्यने पंतप्रधान कार्यालायाला एक पत्र लिहिलं आहे. कुटुंबाला मिळत असलेल्या सरकारी सुविधा काढून घेण्यात याव्यात, अशी मागणी या पत्रातून नमिता भट्टाचार्य यांच्याकडून करण्यात आली आहे. कुटुंब स्वतःचा खर्च उचलण्यास सक्षम असल्याचं नमिता यांनी म्हटलं आहे. सध्या कुटुंबाला मिळत असलेल्या …

आम्हाला सरकारी सुविधा नको, वाजपेयींच्या मुलीचं पीएमओला पत्र

नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांची मानलेली मुलगी नमिता भट्टाचार्यने पंतप्रधान कार्यालायाला एक पत्र लिहिलं आहे. कुटुंबाला मिळत असलेल्या सरकारी सुविधा काढून घेण्यात याव्यात, अशी मागणी या पत्रातून नमिता भट्टाचार्य यांच्याकडून करण्यात आली आहे. कुटुंब स्वतःचा खर्च उचलण्यास सक्षम असल्याचं नमिता यांनी म्हटलं आहे.

सध्या कुटुंबाला मिळत असलेल्या सर्व सरकारी सुविधा काढून घेण्यात याव्यात. कारण, कुटुंब खर्च उचलण्यास सक्षम आहे. या सुविधा घेऊन सरकारी तिजोरीवर भार बनायचं नाही. कृष्णा मेनन मार्गावरील सरकारी बंगला रिकामा करुन खाजगी घरात शिफ्ट होण्याची इच्छा आहे. त्यामुळे एसपीजी सुरक्षाही काढून घ्यावी, असं नमिता यांनी पत्रात म्हटलं आहे.

सरकारच्या वतीने माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये सुरक्षेचाही समावेश आहे. याशिवाय मोफत उपचार, सरकारी स्टाफ, डोमेस्टिक विमान तिकिटे आणि मोफत ट्रेन प्रवास अशा सुविधांचा समावेश आहे. वाजपेयी यांच्या कुटुंबात दत्तक मुलगी नमिता, जावाई रंजन भट्टाचार्य आणि नात निहारीका यांच्यासह इतर सदस्य आहेत.

माजी पंतप्रधानांच्या कुटुंबांना जीवनभर सुरक्षेची तरतूद तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीच केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी एसपीजी कायद्यात संशोधनही केलं होतं. पण त्यांच्याच कुटुंबाने सरकारी तिजोरीतून सुविधा घेण्यास विनम्रपणे नकार दिला आहे.

एकीकडे सरकारी तिजोरीच्या जोरावर अनेक सुविधा लाटणारे नेते आपण पाहतो. तर दुसरीकडे वाजपेयी यांच्या मानलेल्या मुलीने सरकारी बंगला आणि मिळणाऱ्या सर्व सुविधा काढून घेण्याची विनंती थेट पीएमओला पत्र लिहून केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *