Weather Update : दिवाळी उत्सवात दिल्लीमध्ये हवेची पातळी ‘गंभीर’; या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

दिल्ली आणि नजिकच्या अनेक भागांमध्ये रविवारी हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update : दिवाळी उत्सवात दिल्लीमध्ये हवेची पातळी 'गंभीर'; या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 7:55 AM

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali 2020) मुळे यंदा वायू प्रदूषणात (Air Pollution) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता गंभीर ठप्प्यात पोहोचली आहे. इतकंच नाही तर, भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि नजिकच्या अनेक भागांमध्ये रविवारी हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम भागात हवामानातील अस्थिरतेमुळे हवामानात बदल होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांतही पाऊस पडण्याची शक्यता आहे. (weather news 15 November 2020 air quality low in delhi imd rain alert winter news update)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवारी हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत होती. अशात अनेक भागांमध्ये फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाचा धोका आणखी वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वायु गुणवत्तेची देखरेख करणारी यंत्रणा ‘सफर’ च्या मते स्थानिक पातळीवरसुद्धा वायू प्रदूषणात वाढ झाली. याचा रविवारी आणि सोमवारी वाईट परिणाम पाहायला मिळू शकतो.

पश्चिमी भागातील हवामानात झालेल्या बदलांमुळे रविवारी हलका पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दिवाळीनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याचीही शक्यता आहे. तर रविवारी वाऱ्याचा कमाल वेग 12 ते 15 किमी / तासाने राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईलाही प्रदूषणाचा सर्वाधिक धोका सर्व प्रकारच्या वायू प्रदुषणात मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सन 2019-20 या वर्षाचा अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दरम्यानच्या, काळात महाराष्ट्रासह देशातील उद्योग बंद होते. रेल्वे, वाहतूक बंदी होती. त्यामुळं उद्योगांची चाकं थांबली. गाड्याची चाकं थांबली. यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी घसरली असली तरी पुन्हा मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याने प्रदूषण वाढू लागलं आहे. चंद्रपूर आणि घुगुस या दोन ठिकाणी सर्वाधिक प्रदूषणात वाढ झाल्याचं प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

इतर बातम्या – 

CM Uddhav Thackeray | राज्यात फटाक्यांवर बंदी नाही, पण प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रदूषण वाढ, ‘या’ शहराला आहे सर्वाधिक धोका

(weather news 15 November 2020 air quality low in delhi imd rain alert winter news update)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.