पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मालमत्ता किती? जाणून घ्या…

ममता बॅनर्जी आपल्या साधेपणाने पुन्हा एकदा बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:35 PM, 2 Mar 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मालमत्ता किती? जाणून घ्या...
cm Mamta Banarjee

कोलकाताः पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झालीय. राज्यात सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीची धुरा हाती घेतलीय. तर भाजपकडूनही अमित शहा यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरलेत. ममता बॅनर्जी या सातत्याने विरोधकांवर हल्ला चढवत असतात. सरकारच्या कामगिरीतही त्या पुढे आहेत. ममता बॅनर्जी आपल्या साधेपणाने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (West Bengal Election 2021 Know About Chief Minister Mamta Banerjee Property And How Much She Has Gold Know)

ममता बॅनर्जी नेहमीच आपल्याला साध्या साडीत पाहायला मिळतात

ममता बॅनर्जी नेहमीच आपल्याला साध्या साडीत पाहायला मिळतात. परंतु साधे राहणीमान असलेल्या ममतांची एकूण मालमत्ता किती तुम्हाला माहीत आहे काय?, तसेच आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लवकरच आपल्या मालमत्तेची ताजी माहिती निवडणूक आयोगाला देणारच आहेत. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती होती आणि त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कोणती माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊयात

मालमत्ता किती आहे?

ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांच्याकडे 30 लाख 45 हजार 13 रुपयांची संपत्ती आहे. म्हणजेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 30 लाख रुपयांची संपत्ती आहे. यात त्यांनी जवळपास जंगम मालमत्तेचा तपशील दिलाय.

ममता बॅनर्जी यांच्याकडे किती पैसे आहेत?

निवडणूक आयोगात ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ममता बॅनर्जी यांच्याकडे सुमारे 18 हजार रुपये रोख, बँक खात्यात सुमारे 27 लाख रुपये आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोस्ट ऑफिस योजनेत सुमारे 18 हजार रुपयांची गुंतवणूक केलीय. ममता बॅनर्जी यांनी एकाला सुमारे 5000 रुपयांचे कर्ज दिले असून, त्यांच्याकडे सुमारे 26 हजार रुपयांचे सोने आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 2 लाख 15 रुपयांची मालमत्ता आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांच्याकडे एकूण 30 लाख 45 हजार रुपयांची संपत्ती आहे. खास गोष्ट म्हणजे ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ जंगम मालमत्ता आहे म्हणजेच त्यांच्याकडे फक्त बँक, गुंतवणूक किंवा रोख पैसे आहेत. त्यांच्या नावावर जमीन, घर, कार नाही. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातही जागेबद्दल माहिती दिलेली आहे. याशिवाय त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही. म्हणजेच त्यांना कुठेही एक रुपया भरावा लागत नाही.

ममता बॅनर्जी यांचे शिक्षण किती?

जर आपल्याला ममता बॅनर्जी यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास ममता बॅनर्जी या पदव्युत्तर आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी एलएलबी, बीएडचा अभ्यासही केलाय. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमए केले. त्याचबरोबर त्यांनी जोगेश चंद्र चौधरी महाविद्यालयातून एलएलबी आणि बीएडचे शिक्षण घेतले.

संबंधित बातम्या

बिहारच्या ‘तीळकूटा’चे बंगाली मिठाईशी गूळपीठ? ममता बॅनर्जी-तेजस्वी यादव भेट होणार

West Bengal Election 2021 : तृणमूल काँग्रेस 80 वर्षांवरील नेतेमंडळींना ‘मार्गदर्शक मंडळा’त पाठवणार!

West Bengal Election 2021 Know About Chief Minister Mamta Banerjee Property And How Much She Has Gold Know