जिनिव्हा करार नेमका काय आहे?

भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची अखेर उद्या सुटका होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत या संदर्भात घोषणा केली. जिनिव्हा कराराच्या नियमानुसार, अभिनंदन यांची सुटका करणं बंधनकारकच होत. याच कराराच्या माध्यमातून अभिनंदन यांची सुटका होण्यासाठी संपूर्ण जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत होता. अखेर भारताच्या दबावाला बळी पडत तिसऱ्याच दिवशी विंग कमांडर अभिनंदन […]

जिनिव्हा करार नेमका काय आहे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची अखेर उद्या सुटका होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत या संदर्भात घोषणा केली. जिनिव्हा कराराच्या नियमानुसार, अभिनंदन यांची सुटका करणं बंधनकारकच होत. याच कराराच्या माध्यमातून अभिनंदन यांची सुटका होण्यासाठी संपूर्ण जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत होता. अखेर भारताच्या दबावाला बळी पडत तिसऱ्याच दिवशी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका होते आहे. जर पाकिस्तानने असं केलं नसतं, तर मग पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर याची मोठी किंमत चुकवावी लागली असती.

जिनिव्हा करार नेमका काय आहे?

जगात सर्वाधिक कालावधी चालणार महायुद्ध म्हणून दुसरं महायुद्ध ओळखलं जात. या महायुद्धात सैनिकांबरोबरच लाखो सामान्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या युद्धानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘ जिनिव्हा ‘ कराराची निर्मिती केली.

युद्धकाळातील तह, जखमी झालेले सैनिक व युद्धकैद्यांचे मुलभूत अधिकार जपणारा जिनिव्हा करार आहे. युद्धात सहभागी नसलेले नागरिक, जखमी आणि शस्त्रसमर्पण केलेले सैनिक यांना कोणताही शारीरिक, मानसिक त्रास देता येणार नाही, असे हा करार सांगतो. युद्धकैद्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून आपली ख्याली खुशाली कळवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. युद्धकैद्यांवर योग्य न्यायिक सहाय्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे.

हा करार पाळावा यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहे. म्हणजेच, शत्रू देशात सैनिक जर सापडला तर तो आपल्या पूर्ण गणवेशात असावा. तसेच, शत्रूराष्ट्रांनी विचारणा केल्यानंतर सैनिकाने आपलं नाव, हुद्दा आणि इतर माहिती द्यावी, मात्र वैयक्तिक माहिती वगळता इतर गुप्त माहिती देणं बंधनकारक नाही. हे नियम त्या सैनिकाने पाळल्यास जिनिव्हा करारानुसार सबंधित सैनिकाच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे विरुद्ध देशाला अनिवार्य आहे.

जो देश या करारावर सही करूनही या कलमांचे पालन करत नाही त्याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी कारवाई करण्यात येऊ शकते.

पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय पायलटनी आपले नाव अभिनंदन वर्धमान, हुद्दा विंग कमांडर आणि सर्व्हिस नंबर 27981 इत्यादी गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. यामुळेच पाकिस्तानने ते जिनिव्हा कराराच्या तिसऱ्या कलमानुसार त्यांना माणुसकीने वागवणे अपेक्षित आहे. याच जिनिव्हा करारात जगातल्या 196 देशांनी स्वाक्षरी करत आपला सहभाग नोंदवला आहे. इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तानही या करारात सामील आहेत. त्यामुळे जर पाकिस्तानने अभिनंदन यांना सोडलं नसतं, तर पाकिस्तानला 196 देशांचा विरोध सहन करत मोठी किंमत मोजावी लागली असती.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....