सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु झालंय. देशावर कोण राज्य करणार ते 24 तासात स्पष्ट होणार आहे. मतमोजणी सुरु होताना सर्वात अगोदर पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाते. यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु होते. नियमानुसार पोस्टल बॅलेट ईव्हीएममधील मतांच्या अगोदरच मोजले जातात. पोस्टल बॅलेटची मतं म्हणजे मत पत्रांवर आलेली मतं असतात, संख्याही कमी असल्यामुळे मोजणी …

सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट काय असतात?

नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरु झालंय. देशावर कोण राज्य करणार ते 24 तासात स्पष्ट होणार आहे. मतमोजणी सुरु होताना सर्वात अगोदर पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाते. यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु होते. नियमानुसार पोस्टल बॅलेट ईव्हीएममधील मतांच्या अगोदरच मोजले जातात. पोस्टल बॅलेटची मतं म्हणजे मत पत्रांवर आलेली मतं असतात, संख्याही कमी असल्यामुळे मोजणी सोपी होते. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता नसते.

Postal ballot पेपर्स मतपत्रिका असतात. या माध्यमातून मतदाराने मतदानाचा हक्क बजावलेला असतो. ड्युटीवर असणारे कर्मचारी, सैन्यातील जवान यांनाच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची संधी मिळते. याव्यतिरिक्त कुणालाही अशी सुविधा दिली जात नाही. खबरदारीचा उपाय म्हणून अटक केलेल्या व्यक्तींनाही पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा दिली जाते.

पोस्टल बॅलेटच्या मतदारांची संख्या निवडणूक आयोगाकडून अगोदरच ठरवली जाते. यानंतर मतदानाची सर्व प्रक्रिया पार पडते. कोणतीही इलेक्ट्रॉनिक सुविधा नसलेले जवान आणि कर्मचारी यांना पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवली जाते. मतदाराला ही पत्रिका न मिळाल्यास पत्रिका पुन्हा मूळ पत्त्यावर परत येते.

ईव्हीएमच्या अगोदर निवडणूक मतपत्रिकांवरच होत होती. मतपत्रिकेवर उमेदवाराचं चिन्ह आणि नाव छापलेलं असायचं. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर बॅलेट पेपर दिला जायचा. यानंतर मतदाराकडून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला चिन्हासमोर शिक्का मारुन मतदान केलं जायचं. ही मतपत्रिका पुढे बॅलेट बॉक्समध्ये टाकली जायची.

मतदानानंतर हे बॅलेट बॉक्स स्ट्राँग रुममध्ये नेले जायचे. या प्रक्रियेमध्ये प्रचंड मेहनत आणि खर्च लागत होता. शिवाय मतपेट्यांचा सांभाळ करणंही मोठी जबाबदारी होती. बूथ कॅप्चरिंगच्या घटनाही अनेकदा होत होत्या. मतदाराला धमकावून मतपत्रिकेवर शिक्का मारायला लावायच्या घटना घडायच्या. विशेष म्हणजे मतपत्रिका छापण्यासाठी प्रचंड खर्च व्हायचा. यानंतर निवडणूक आयोगाने प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला. भारतात 1982 मध्ये केरळच्या निवडणुकीत एका मतदान केंद्रावर पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला. यानंतर ईव्हीएमचा वापर सुरु झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *