Chandrashekhar guruji : आधी पाया पडून दर्शन घेतलं, नंतर धारदार चाकूनं भोसकलं; चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येमागचं कारण काय?

चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजींवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

Chandrashekhar guruji : आधी पाया पडून दर्शन घेतलं, नंतर धारदार चाकूनं भोसकलं; चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येमागचं कारण काय?
चंद्रशेखर अंगडी (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: ManavGuru
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 3:25 PM

हुबळी, कर्नाटक : सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar guruji) यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. अत्यंत धक्कादायक अशा या घटनेने कर्नाटक हादरले. याप्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर चाकूचे सपासप वार करत असल्याचे दिसत आहेय प्रेसिडेंट हॉटेलच्या रिसेप्शनजवळ आरोपींनी त्यांची चाकूने वार करत (Attack) हत्या केल्याचा हा व्हिडिओ समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर यांची मंगळवारी (5 जुलै) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आली. या आरोपींनी आधी गुरुजींचे दर्शन घेतले आणि नंतर सपासप वार करत त्यांची निर्दयी पद्धतीने हत्या (Murder) केली. भरदिवसा हॉटेलमध्ये झालेल्या या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे.

काही तासांतच आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनुयायी म्हणून उभे असलेल्या व्यक्तींनी गुरुजींवर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, दोन कथित अनुयायांनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजींवर धारदार शस्त्राने हल्ला केला. चंद्रशेखर गुरुजी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्थे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हत्येनंतर काही तासांतच पोलिसांनी मंजुनाथ मारेवाड आणि महान्तेश यांना रामदूर्ग येथून अटक केली.

बसवराज बोम्मईंकरून दु:ख व्यक्त

पोलिसांनी सांगितले की, चंद्रशेखर गुरुजींना कोणीतरी हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊ नका, असे सांगितले होते. तो लॉबीत शिरताच दोन जणांनी त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी विजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी हुबळी येथे गुरुजींच्या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता, त्यासाठी ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले, की सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. गुरुजींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल. हे हत्याकांड निंदनीय आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

कारणांचा शोध सुरू

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे, का या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. चंद्रशेखर गुरुजींनी कंत्राटदार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे त्यांना मुंबईत नोकरी लागली. त्यानंतर चंद्रशेखर यांनी वास्तू विषयक काम सुरू केले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.