काँग्रेसचं सरकार येईपर्यंत पोटगी न देण्याची सूट द्या, टीव्ही कलाकाराची कोर्टात याचिका

इंदूर (मध्य प्रदेश) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास ‘किमान वेतन योजना’ लागू करु अशी घोषणा केली. यावर देशात जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला वर्षाला 72 हजार रुपये देऊ, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र या दरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूर येथील एका टीव्ही कलाकाराच्या याचिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. […]

काँग्रेसचं सरकार येईपर्यंत पोटगी न देण्याची सूट द्या, टीव्ही कलाकाराची कोर्टात याचिका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

इंदूर (मध्य प्रदेश) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास ‘किमान वेतन योजना’ लागू करु अशी घोषणा केली. यावर देशात जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला वर्षाला 72 हजार रुपये देऊ, असं राहुल गांधी म्हणाले. मात्र या दरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूर येथील एका टीव्ही कलाकाराच्या याचिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. “माझी आर्थिक परिस्थीती खूप वाईट आहे. राहुल गांधीचे सरकार आल्यावर किमान वेतन योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून मी माझ्या पत्नीला पोटगी देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसचं सरकार येईपर्यंत पोटगी न देण्याची सूट मिळावी, अशी याचिका त्याने कौंटुबीक न्यायालयात केली आहे.

टीव्ही कलाकार आनंद शर्मा (38) यांनी इंदूर न्यायालयात अशा प्रकारची याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा एकदा किमान वेतन योजनेच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. शर्मा यांची पत्नी आणि 12 वर्षीय मुलगी गेले काही वर्षांपासून वेगळे राहत आहेत. पती-पत्नी यांच्या घटस्फोटाचा वाद न्यायालयात सुरु आहे.

शर्माचे वकील मोहन पाटीदार म्हणाले, “न्यायालय शर्माच्या या याचिकेवर 29 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. न्यायालयाने 12 मार्च 2019 रोजी आदेश दिला होता की, आपल्या पत्नीला आणि मुलीला 4,500 प्रति महिना पोटगी द्यावी लागेल”.

टीव्ही कलाकार आनंद शर्मा म्हणाले, “केंद्रात जर काँग्रेसचे सरकार आले, तर माझ्या बँक खात्यात किमान वेतन योजनेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या 6 हजारातून मी 4,500 पोटगी माझ्या पत्नी आणि मुलीला देईल”.

याचिकेत म्हटलं आहे की, शर्मा टीव्ही मालिकेत छोठ्या-मोठ्या भूमिका साकारतो. ज्यामुळे त्याला प्रत्येक महिन्याला पाच ते सहा हजार रुपयांची कमाई होते. कमाईमध्ये तो त्याचे आणि त्याच्या आई-वडिलांना सांभाळू शकतो.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.