बांगलादेशमधील परिस्थितीला कोणता देश जबाबदार? भारताला का आहे सावध राहण्याची गरज

बांगलादेशात सुरू असलेल्या संकटावर माजी लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी म्हणाले की, या सगळ्यामागे आंतरराष्ट्रीय प्रभाव हेही एक प्रमुख कारण असू शकते. भारताला सावध राहण्याची गरज का आहे जाणून घ्या.

बांगलादेशमधील परिस्थितीला कोणता देश जबाबदार? भारताला का आहे सावध राहण्याची गरज
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 12:19 AM

बांगलादेशात प्रचंड हिंसा झाल्यानंतर सोमवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर असा दिवस येईल याची त्यांनी कल्पना देखील केली नसेल. रस्त्यावर आक्रोश वाढत चालला होता. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकारची स्थापना केली जाणार आहे. बांगलादेशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीबाबत एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की या सगळ्यामागे जबाबदार कोण? संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी बांगलादेशात सुरू असलेल्या युद्धासाठी बाह्य हस्तक्षेपाला जबाबदार धरले आहे. बांगलादेशातील संघर्षात आंतरराष्ट्रीय प्रभाव हे प्रमुख कारण मानले जात आहे.

बांगलादेशच्या संकटामागे कोण?

माजी लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी (निवृत्त) यांनी बांगलादेशातील राजकीय संकटावर एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ते (शंकर रॉयचौधरी) म्हणाले की, ‘शेजारील देशात तीव्र अशांतता असेल तर ती आपल्यासाठीही मोठी चिंता निर्माण करते.’

‘काळजी घ्यावी लागेल’

माजी लष्करप्रमुख जनरल शंकर रॉय चौधरी म्हणाले, ‘प्रत्येकाने या आव्हानाबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही परकीय देशाच्या प्रश्नात ढवळाढवळ करणे हे आपले काम नाही, परंतु आपल्याला आपल्या सीमा अतिशय सुरक्षित ठेवल्या पाहिजेत.

आंतरराष्ट्रीय प्रभाव हे कारण आहे का?

ते म्हणाले, आपण आपला देश अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या मजबूत करणे आवश्यक आहे. आम्ही देशाला कोणत्याही प्रकारे धोक्यात येऊ देऊ शकत नाही. बांगलादेशात जे काही घडले त्याला आंतरराष्ट्रीय प्रभावही जबाबदार असू शकतो. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडले असून त्यांना सुरक्षितपणे देश सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारताविरुद्ध विष कोण पेरत आहे?

बांगलादेशातील भारत समर्थित हसीना सरकार आता बाहेर पडले आहे हा मोठा प्रश्न आहे. यापूर्वीही अशीच परिस्थिती श्रीलंकेत पाहायला मिळाली होती आणि तिथेही आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले होते. महत्त्वाची बाब म्हणजे श्रीलंकाही चीनच्या कर्जाखाली होता.

चीन समर्थक म्हटल्ये जाणारे मोहम्मद मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधही बिघडले आहेत. मात्र, भारताच्या कठोर वृत्तीने मालदीवने गुडघे टेकले. तर भारताचे पाकिस्तानशी असलेले वैर जगजाहीर आहे. आशियामध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.