एअर स्ट्राईक जगाने मान्य केली, आपल्याच लोकांना शंका : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पुलवामा हल्ल्यातील 40 सीआरपीएफ जवानांच्या बलिदानाचा बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केली. पाकिस्तानच्या धडकी भरवणाऱ्या या कारवाईनंतर जगातील अनेक देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन केलं. पण भारतातील काही नेत्यांनी एअर स्ट्राईक झाल्याचे आणि किती दहशतवादी मारले याचे पुरावे मागितले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र …

एअर स्ट्राईक जगाने मान्य केली, आपल्याच लोकांना शंका : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेने पुलवामा हल्ल्यातील 40 सीआरपीएफ जवानांच्या बलिदानाचा बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केली. पाकिस्तानच्या धडकी भरवणाऱ्या या कारवाईनंतर जगातील अनेक देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन केलं. पण भारतातील काही नेत्यांनी एअर स्ट्राईक झाल्याचे आणि किती दहशतवादी मारले याचे पुरावे मागितले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. विविध मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. शिवाय एनडीए सरकारने गेल्या पाच वर्षात काय केलं याबाबतही त्यांनी सांगितलं. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांनी एअर स्ट्राईकचा पुरावा मागितला आहे.

भारतात काही लोक सैन्याच्या कारवाईवर शंका घेतात. यांचे लेख आणि वक्तव्य पाकिस्तानमध्ये पुरावा म्हणून दाखवले जातात. मोदी विरोध नक्की करा, पण मोदी विरोध करता करता देशविरोधी होऊ नका. या मोदीविरोधात मसूद अजहर, हाफिज सईद यांच्यासारख्या दहशतवाद्यांना वाचण्याची संधी देऊ नका, असं मोदी म्हणाले. जगाने आपली कारवाई मान्य केली असताना आपलेच लोक त्यावर शंका घेत असल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केली.

“आज राफेलची उणीव भासते”

भारताने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यासाठी मिराज 2000 लढाऊ विमान वापरलं. मिराज 2000 हे भारताने बऱ्याच वर्षांपूर्वी फ्रान्सकडून खरेदी केलेलं विमान आहे. पण या कारवाईच्या वेळी राफेल विमानाची उणीव असल्याचं संपूर्ण देशाला जाणावलं, असं मोदी म्हणाले. शिवाय आज भारतीय वायूसेनेकडे राफेल विमान असतं, तर परिणाम आणखी वेगळा दिसला असता, असंही ते म्हणाले.

अगोदर स्वार्थासाठी आणि आता राजकारणासाठी आपल्या सैन्याचं आधुनिकीकरण होऊ शकलं नाही. अगोदर प्रत्येक शस्त्र व्यवहारात मध्ये दलाल असायचा. त्यामुळे व्यवहार होऊ शकले नाही आणि आधुनिकीकरणही झालं नाही. हे दलाल कुणाच्या जवळचे होते हे देशाला माहित आहे. 2009 ते 2014 या काळात जवानांसाठी एकही बुलेट प्रूफ जॅकेट उपलब्ध होऊ शकलं नाही. आमच्या काळात 230000 बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी करण्यात आले. शिवाय दलालांचीही आम्ही सुटका केली. भ्रष्टाचाराला कुठेही वाव नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *