शेख हसीना यांचे विमान दिल्ली ऐवजी उत्तर प्रदेशातील हिंडन एअरबेसवर का उतरवण्यात आलं?

Shaikh Hasina : देशात वाढत चाललेल्या हिंसाचाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांंना पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. पण त्यांचे विमान कुठे उतरणार याची माहिती लँडिंगपूर्वीपर्यंत कुणालाच माहित नव्हती. पण शेख हसीना याचे विमान दिल्ली ऐवजी उत्तर प्रदेशात का उतरवण्यात आले जाणून घ्या.

शेख हसीना यांचे विमान दिल्ली ऐवजी उत्तर प्रदेशातील हिंडन एअरबेसवर का उतरवण्यात आलं?
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 9:23 PM

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांना देश सोडून इतर देशात आश्रय घ्यावा लागला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी देश सोडला. बांगलादेशवरुन थेट विमान भारतात आलं आणि गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरलं. शेख हसीना या काही काळ भारतातच राहणार असून त्यानंतर त्या लंडन किंवा इतर ठिकाणी कुठेतरी जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर लष्कराने आता देशाचे सूत्र हाती घेतले आहे. लवकरच काळजीवाहू सरकार स्थापन केलं जाणार असल्याची माहिती लष्कर प्रमुखांनी दिली आहे. देशाची राजधानी दिल्लीतील IGI सारख्या VIP विमानतळाऐवजी शेख हसीना यांचे विमान गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर का उतरवण्यात आले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आशियातील सर्वात मोठे एअरबेस

जेव्हा कोणत्याही देशाचे प्रमुख भारतात येतात तेव्हा त्यांना दिल्लीतील IGI विमानतळावर उतरवले जाते. तेथेच त्यांचे स्वागत केले जाते. मात्र यावेळी शेख हसीना यांच्यासोबत तसे झाले नाही. शेख हसीना यांचे विमान थेट उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरवण्यात आले. सोशल मीडियावर लोकं याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत. पण त्याची खरी कहाणी काही औरच आहे.

हिंडन एअरबेस हे आशियातील सर्वात मोठे एअरबेस आहे. ज्याच्यावर हवाई दलाचे नियंत्रण आहे. या एअरबेसवर भारताची अनेक विमाने आणि लढाऊ विमाने तैनात असतात. याशिवाय येथील सुरक्षा व्यवस्था सामान्य विमानतळांपेक्षा अधिक मजबूत असते. आता शेख हसीना ज्या परिस्थितीत भारतात आल्या आहेत त्यामुळे त्या सामान्य नाहीत. यामुळेच शेख हसीना यांचे विमान दिल्लीच्या व्यस्त IGI विमानतळाऐवजी हिंडन एअरबेसवर उतरवण्यात आलं.

शेख हसीना दिल्लीत उतरल्या असत्या तर काय झालं असतं?

शेख हसीना यांचे विमान कुठे उतरणार याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव शेख हसीना यांचे विमान कुठे उतरणार याची माहिती दिली गेली नव्हती. तज्ज्ञांच्या मते, शेख हसीना यांचे विमान दिल्लीत न उतरवता ते यूपीत एअर फोर्सच्या ताब्यात असलेल्या विमानतळावर उतरवण्यात आले. याचे कारण म्हणजे ही भारतीय गुप्तचर यंत्रणांची रणनीती असू शकते. दिल्लीचे IGI विमानतळ हे अतिशय व्यस्त विमानतळ आहे. येथे दररोज व्हीआयपी मुव्हमेंट असतात.

जर शेख हसीना यांचे विमान दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर उतरले असते, तर तेथील सुरक्षा व्यवस्था सांभाळणे आमि हाताळणे यात अडचणी आल्या असत्या. त्यांना विमानतळावरून रस्त्याने सुरक्षित स्थळी नेणे अत्यंत आव्हानात्मक होते. त्यामुळेच तज्ज्ञांच्या मते त्यांचे विमान दिल्लीच्या IGI विमानतळावर नाही तर उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरवण्यात आले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.