अमेरिकेच्या तोडीस तोड! अवघ्या बारा तासात मुंबईतून दिल्लीत पोहचणार; नितीन गडकरींची घोषणा

आगामी काळात मुंबई-दिल्ली हे अंतर केवळ बारा तासांत पार करता येईल, असे रस्ते बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या या प्रवासाला 26 तास लागतात. तर दिल्ली-जयपूर अंतर दोन तासांवर आणणार असल्याचेही गडकरी म्हणाले. सध्या या प्रवासाला सहा तास लागतात. चैन्नई ते बंगळुरु हे अंतर आत्ताच्या सात तासांवरुन दोन तासांवर आणण्याचा प्रयत्न असल्याचेही गडकरी म्हणाले.

अमेरिकेच्या तोडीस तोड! अवघ्या बारा तासात मुंबईतून दिल्लीत पोहचणार; नितीन गडकरींची घोषणा
नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 5:15 PM

नवी दि्ल्ली : देशात 2024 संपेपर्यंत 26 ग्रीन एक्स्प्रेस वे(Green Expressway) तयार करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांनी केली आहे. या रस्त्यांवर 125-130 किमी-प्रतितास वेगाने गाड्या चालवता येणे शक्य होणार आहे. लोकसभेत बोलताना नितीन गडकरींनी दावा केला आहे ती 2024 संपण्यापूर्वी देशातील इन्फास्ट्रक्चर हे अमेरिकेच्या तोडीस तोड असेल. आगामी काळात मुंबई-दिल्ली(Mumbai to Delhi ) हे अंतर केवळ बारा तासांत पार करता येईल, असे रस्ते बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या या प्रवासाला 26 तास लागतात. तर दिल्ली-जयपूर अंतर दोन तासांवर आणणार असल्याचेही गडकरी म्हणाले. सध्या या प्रवासाला सहा तास लागतात. चैन्नई ते बंगळुरु हे अंतर आत्ताच्या सात तासांवरुन दोन तासांवर आणण्याचा प्रयत्न असल्याचेही गडकरी म्हणाले.

निधीची कमतरता नाही – गडकरी

सद्यस्थितीत नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडियाची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली आहे. लोकसभेत ऑन रेकॉर्ड हे सांगत असल्याचेही गडकरी म्हणाले. प्रत्येक वर्षात पाच लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. सदनातील कुठल्याही खासदाराने रस्त्यांसाठी पैसे मागितल्यावर त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असेही गडकरी म्हणाले. कोणत्याही पक्षाच्या खासदाराला मनाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहनांच्या नंबर प्लेट बदलणार

सध्या असणाऱ्या टोलच्या पदधतीतही बदल करण्याबाबत विचार सुरु असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जीपीएसच्या मदतीने ऑटोमॅटिक टोल कपातीबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरा पर्याय म्हणजे, सर्व वाहनांच्या नंबर प्लेट बदलून, त्या माध्यमातून टोल ऑटोमॅटिक पद्धदतीने कापण्याच्या कल्पनेवरही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

50 हजार किमी लांब हायवे नेटवर्कची देखभाल करतेय NHAI

नॅशनल हायवे एथॉरिटी ऑफ इंडिया ही सरकारची स्वायत्त यंत्रणा आहे. 1995 साली याची स्थापना करण्यात आली. सध्या देशातील 1 लाख 32 हजार 499 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी 50 हजार किमी नेटवर्कची देखभाल ही संस्था करीत आहे. आगामी काळात राष्ट्रीय महामार्ग असलेल्या जिल्ह्यांची संख्या 300 ने वाढवून 550 करणे, रस्त्यांवरती रेस्टरुम, फूल प्लाजा आणि वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.