तांदळाची निर्यात बंद! केंद्राच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा की तोटा? सर्वसामान्यांवर काय परिणाम?

भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात करण्यात आल्याने केंद्र सरकारकडून निर्यातीवर आता कर लावण्यात आला आहे. सध्या सरकारी गोदामांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 22 लाख टनांचा साठा कमी झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धान्याचे क्षेत्र सुमारे 23 लाख हेक्टरने मागे पडले आहे.

तांदळाची निर्यात बंद! केंद्राच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा की तोटा? सर्वसामान्यांवर काय परिणाम?
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 9:29 AM

मुंबईः सध्या सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असतानाच तांदळाच्या (Rice) वाढत्या किंमती पाहून केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून तांदळाच्या किंमती वाढत होत्या, त्यामुळे केंद्र सरकारने तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून गुरुवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के कर लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी (Ban on export) घालण्यात आली आहे. सध्या सरकारी गोदामांमधून कमी साठा आणि भातशेती क्षेत्रात झालेली घट आणि तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात झाल्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्यातीवर कर लादला आहे.

एकीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के कर लावण्यात आला आहे तर दुसरीकडे मात्र तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे. 2022 साली एप्रिल ते जुलै महिन्याच्या कालावधीत 73 लाख टनांहून अधिक तांदूळ निर्यात करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकचा निर्यातीवर  कर

भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात करण्यात आल्याने केंद्र सरकारकडून निर्यातीवर आता कर लावण्यात आला आहे. सध्या सरकारी गोदामांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 22 लाख टनांचा साठा कमी झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धान्याचे क्षेत्र सुमारे 23 लाख हेक्टरने मागे पडले आहे.

निर्यातीचे नियम जाहीर

या कारणांमुळे देशांतर्गत तांदळाचा पुरवठा मर्यादित करण्यासाठी केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर कडक नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे निर्यातीचे नियम जाहीर झाल्यानंतर त्याचे भाव किती कमी होणार की वाढणार हे आता काहीच दिवसात स्पष्ट होईल. कारण गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही बाजारात मात्र गव्हाचे भाव चढलेलेच होते.

मागील वर्षाच्या तुलनेत दर

जानेवारी 2021 मध्ये या तांदळाचा दर प्रति किलो 19 रुपये होता तोच दर आता प्रति किलो 24 रुपये झाला आहे. मागील वर्षी 7 सप्टेंबर रोजी धानाचा एमएसपी 3 हजार 41 रुपये होता तर तो यंदा तोच दर 3 हजार 291 रुपये झाला आहे.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.