सेल्फी काढण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांचा गराडा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच गर्दी केली. अभिनंदन हे जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या सहकाऱ्यांना भेटले. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. सहकाऱ्यांनी सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली. दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिनंदन यांनी सर्वांचे आभारही मानले. पाहा व्हिडीओ #WATCH Viral video from Jammu & Kashmir: …

सेल्फी काढण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सहकाऱ्यांचा गराडा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच गर्दी केली. अभिनंदन हे जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या सहकाऱ्यांना भेटले. यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. सहकाऱ्यांनी सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली. दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिनंदन यांनी सर्वांचे आभारही मानले.

पाहा व्हिडीओ

विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग 21 या विमानाच्या सहाय्याने शौर्य दाखवत पाकिस्तानची घुसखोरी हाणून पाडली होती. अभिनंदन यांच्या या शौर्याचा वीरचक्र पुरस्काराने गौरव करण्यासाठी वायूदलाने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्ताननेही भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानच्या घुसखोरीला आक्रमक असे उत्तर अभिनंदन यांनी दिले होते. तेव्हापासून अभिनंदन हे चर्चेत आले. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.

पाकिस्तानमधून सुटका झाल्यानंतर अभिनंदन यांच्यावर उपचार करण्यात आले. फिट होऊन ते पुन्हा सेवेत दाखल झाले आहेत. पण सुरक्षेच्या दृष्टीने काश्मीर घाटीतून त्यांची बदली पश्चिम एअरबेसवर करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *