विंग कमांडर अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीतून सुटून भारतात परतले आहेत. पाकिस्तानने त्यांना कोणताही शारीरिक त्रास दिला नाही. पण पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची दिल्लीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिवाय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनीही त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मानसिक स्वास्थ्य तपासण्यासाठीही अभिनंदन …

Big Story News, विंग कमांडर अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीतून सुटून भारतात परतले आहेत. पाकिस्तानने त्यांना कोणताही शारीरिक त्रास दिला नाही. पण पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात त्यांचा मानसिक छळ करण्यात आल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची दिल्लीत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिवाय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनीही त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मानसिक स्वास्थ्य तपासण्यासाठीही अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यांच्या शरीरात पाकिस्तानने एखादी चिप तर लावली नाही ना, याची चौकशी करण्यासाठी सर्वात अगोदर त्यांना वायूसेनेच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना छळण्याची एकही संधी सोडण्यात आली नाही.

सूत्रांच्या मते, पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांना हतबल करण्यासाठी क्षणोक्षणी प्रयत्न करण्यात आला. त्यांना एवढा मानसिक त्रास दिला, की हतबल करुन पाकिस्तानला हवा तसा अभिनंदन यांचा व्हिडीओ तयार करता येईल. पण अभिनंदन यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीचा सामना केला आणि संकटावर मात केली.

दरम्यान, अभिनंदन यांना सोडण्यापूर्वी त्यांची पाकिस्तानमध्ये बळजबरी मुलाखत घेण्यात आली. विशेष म्हणजे अभिनंदन यांचा जो व्हिडीओ जारी करण्यात आलाय, त्यात 18 कट आहेत. अभिनंदन यांचा चेहरा वापरुन पाकिस्तानने स्वतःची गरळ ओकली आहे. व्हिडीओ पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *