महिलांनी 'थर्टी फर्स्ट'ला अपुरे कपडे घालू नये, गुजरात पोलिसांचा फतवा

बडोदा : नवीन वर्षाच्या तोंडावर गुजरातमधील बडोदा पोलिसांनी एक अजब आदेश काढला आहे. या आदेशानुसार थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी महिलांना लहान कपडे घालण्यावर निर्बंध लावण्यात आला आहेत. ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी महिलांनी अपुऱ्या कपड्यांचा वापर केला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असा आदेश बडोदा पोलिसांकडून काढण्यात आला आहे. बडोद्याचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी जारी केलेल्या …

महिलांनी 'थर्टी फर्स्ट'ला अपुरे कपडे घालू नये, गुजरात पोलिसांचा फतवा

बडोदा : नवीन वर्षाच्या तोंडावर गुजरातमधील बडोदा पोलिसांनी एक अजब आदेश काढला आहे. या आदेशानुसार थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी महिलांना लहान कपडे घालण्यावर निर्बंध लावण्यात आला आहेत. ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी महिलांनी अपुऱ्या कपड्यांचा वापर केला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असा आदेश बडोदा पोलिसांकडून काढण्यात आला आहे.

बडोद्याचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी जारी केलेल्या या आदेशात सांगण्यात आले आहे की, “थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील. त्यासोबतच खासगी आणि सार्वजनिक ठिकाणांवर डान्स पार्टीचे आयोजन करणाऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागेल की, लोकं आणि विशेषकरुन महिला लहान कपडे घालून या आयोजनात सहभागी होणार नाहीत, ज्याने समाजाच्या भावना दुखवल्या जाणार नाही.”

बडोदा पोलिसांनी आयोजकांना प्रत्येक पार्टीत सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले आहेत. बडोदा पोलिसांनी महिलांच्या लहान कपड्यांवरच नाही, तर असभ्य पद्धतीने नाचण्यावरही निर्बंध लावले आहेत. तसेच न्यू ईयर पार्टीत रात्री 10 वाजेनंतर लाउडस्पीकर आणि डीजे यांच्या वापरावरही बंदी लावण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांच्या मते, अशा पार्टीत जे लोक असभ्य पद्धतीने नाचतात त्याचा विपरित परिणाम लहान मुलांवर होतो. गुजरात पोलिसांच्या या आदेशावर सामाजिक स्तरातून टीका करण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *