व्होटिंग कार्ड नसतानाही तुम्ही मतदान करु शकता

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात सध्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहेत. पक्षांचे बडे नेते उमेदवारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. मतदारांनी आपल्याच पक्षाला मतं द्यावी यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते …

व्होटिंग कार्ड नसतानाही तुम्ही मतदान करु शकता

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात सध्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहेत. पक्षांचे बडे नेते उमेदवारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. मतदारांनी आपल्याच पक्षाला मतं द्यावी यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते रात्रंदिवस काम करत आहेत. कारण, ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची लोकसभा निवडणूक आहे. ज्यात सर्वकाही हे देशाच्या जनतेवर, त्यांच्या मतांवर अवलंबून असतं. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांने मतदान करणं आवश्यक आहे.

येत्या 11 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांची सुरुवात होत आहे. देशभरात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे तुमचं नाव मतदार यादीत आहे की, नाही हे पहिल्यांदा तपासून घ्या. जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल, तर त्याची तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे करु शकता. मतदार यादीतील आपलं नाव तपासण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतींचा वापर करु शकता.

 • निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट Electoralsearch.in वर लॉग इन करा. इथे तुम्ही दोन पद्धतीने तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे सर्च करु शकता.
 • पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचं नाव, जन्म तारीख आणि इतर काही महत्त्वाची माहिती टाकून तुम्ही सर्च करु शकता.
 • दुसऱ्या पद्धतीत तुमच्या मतदार कार्डवरील EPIC नंबरच्या माध्यमातून माहिती मिळवू शकता.
 • EPIC नंबर हा मतदाराचा ओळख पत्र क्रमांक असतो. या नंबरच्या मदतीने मतदार यादीत तुम्ही तुमचं नाव तपासू शकता.
 • जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल, तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या 1800111950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.

मतदार कार्ड नसेल तर मतदान कसे करावे?

जर तुमचे मतदार कार्ड नसेल तरीही तुम्ही मतदान करु शकता. निवडणूक आयोगाच्या मतदार ओळख पत्राव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या 11 प्रमाण पत्रांच्या आधारेही मतदान करु शकता.

 1. पासपोर्ट
 2. ड्राव्हिंग लायसन्स
 3. पॅनकार्ड
 4. आधारकार्ड
 5. जर तुम्ही केंद्रीय किंवा राज्य सरकारी कर्मचारी असाल, किंवा PSUs आणि पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कामाला असाल, तर तुम्ही तुमचं आयडी कार्ड दाखवूनही मतदान करु शकता
 6. पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या पासबुकच्या आधारेही तुम्ही मतदान करु शकता
 7. मनरेगा नोकरी कार्ड
 8. कामगार मंत्रालयाने जारी केलेलं आरोग्य विमा कार्ड
 9. पेंशन कार्ड ज्यावर आपला फोटो असेल आणि ते अटेस्टेड असेल त्याद्वारेही तुम्ही मतदान करु शकता
 10. नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (NPR) द्वारे जारी केलेलं स्मार्ट कार्ड
 11. खासदार / आमदार / विधान परिषद सदस्यांकडून जारी केलेलं अधिकृत ओळख पत्र

या 11 प्रमाण पत्रांच्या आधारे तुम्ही मतदार कार्ड नसतानाही मतदानाचा हक्क बजावू शकता.

संबंधित बातम्या :

निवडणुकीत डिपॉझिट जप्त कसं होतं? रक्कम किती असते?

‘पुरोगामी’ पवारांचा नातू वादग्रस्त फादरच्या दरबारात

उमेदवारी अर्जासोबत चिल्लरचा ढिग, वेळ संपला तरी अधिकारी मोजण्यात दंग

तमिळनाडूमध्ये चक्क सोने-चांदीचं ईव्हीएम मशीन

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *