तुम्हाला 2 माणसांच्या मृत्यूची चिंता, 21 गायींची नाही: भाजप आमदार

लखनऊ: सत्ताधारी भाजप नेते कधी काय वक्तव्य करतील याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील अनुपशहरचे आमदार संजय शर्मा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तुम्हाला केवळ दोन लोकांच्या मृत्यूची चिंती आहे मात्र 21 गायींची नाही, असं संजय शर्मा यांनी माजी अधिकाऱ्यांना सुनावलं. बुलंदशहरमध्ये स्याना कोतवालीमध्ये तीन डिसेंबरला हिंसाचार झाला होता. यानंतर उत्तर प्रदेशातील 83 माजी बड्या …

तुम्हाला 2 माणसांच्या मृत्यूची चिंता, 21 गायींची नाही: भाजप आमदार

लखनऊ: सत्ताधारी भाजप नेते कधी काय वक्तव्य करतील याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील अनुपशहरचे आमदार संजय शर्मा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तुम्हाला केवळ दोन लोकांच्या मृत्यूची चिंती आहे मात्र 21 गायींची नाही, असं संजय शर्मा यांनी माजी अधिकाऱ्यांना सुनावलं. बुलंदशहरमध्ये स्याना कोतवालीमध्ये तीन डिसेंबरला हिंसाचार झाला होता. यानंतर उत्तर प्रदेशातील 83 माजी बड्या अधिकाऱ्यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला होता. त्याला संजय शर्मा यांनी उत्तर दिलं.

संजय शर्मा म्हणाले, “या माजी अधिकाऱ्यांना केवळ दोन लोकांच्या मृत्यूची काळजी आहे, मात्र 21 गायींची नाही. मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा निर्णय केवळ जनतेला आहे”

याबाबत संजय शर्मा यांनी खुलं पत्र लिहून माजी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

ज्यांनी गायी मारल्या, तेच खरे गुन्हेगार

आमदार संजय शर्मा यांनी माजी अधिकाऱ्यांना खुलं पत्र लिहिलं आहे. तुम्ही आता बुलंदशहरच्या घटनेने चिंतीत आहात. तुमच्या डोक्यात केवळ दोन लोक सुमीत आणि ड्युटीवरील पोलीस अधिकारी सुबोध कुमार राठोरच्या मृत्यूबाबत चिंता आहे. त्याआधी 21 गायीही मेल्या होत्या. ज्यांनी गायी मारल्या ते खरे अपराधी होते. गौमातेचे आरोपी गर्दीमुळे पळून गेले.

निष्पक्ष चौकशीसाठी हायकोर्टात याचिका

दरम्यान, बुलंशहर गोहत्याप्रकरणानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी प्रयागराज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

18 जानेवारीला सुनावणी

याप्रकरणाची सुनावणी आता 18 जानेवारी 2019 रोजी होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *