आली लहर, केला कहर! महिलेला वारंवार त्रास देणाऱ्याला भररस्त्यात चोपलं

आली लहर, केला कहर! महिलेला वारंवार त्रास देणाऱ्याला भररस्त्यात चोपलं

गिरीश गायकवाड, टीवी 9 मराठी, मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून 55 वर्षीय महिलेची छेड काढणाऱ्या वासनांध पुरुषाला चांगलाच धडा शिकवण्यात आलाय. हा पुरुष फोन करुन अश्लील भाषा वापरायचा. कुणाचंही ऐकत नव्हता. अखेर या महिलेने वासनांधाला धडा शिकवण्याचा चंग बांधला आणि भेटायला बोलावलं. तरुणही टापटीप, नटून थटून भेटायला आला  आणि सुजून-फुगून पोलीस ठाण्यात पोहोचला.

टापटीपपणे भेटायला आलेल्या या वानांध पुरुषाचं मारहाण करुन स्वागत करण्यात आलं. याचा व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

व्हिडीओतील संभाषण

महिलेचा पती – खुप दिवसांपासून फोन करतोय… व्हिडीओ बनवा याचा…. @#@##@, @#@##@ , कालपासून फोन करतोय.. @#@##@…

पीडित महिला – का फोन करतोय… का करतो फोन ?

महिलेचा पती – तुझ्या @#@##@…

पीडित महिला – मी कुठे तू कुठे?

महिलेचा पती – ठार मारेन, @#@##@… नीट उभा राहा… @#@##@.

यानंतर गर्दी जमते… बाईकवर बसलेला हा मजनू पळून जाण्याच्या तयारीत असतो. पण गर्दी त्याला जाऊ देत नाही. महिला कानशिलात लगावत राहते. तरुण माजूरड्यासारखा मार खात राहतो. महिलेचा वारंवार हात झटकतो.

दुसऱ्या व्हिडीओतील संभाषण

पीडित महिला – सहा महिन्यांपासून फोन करून त्रास दिलाय. एवढ्या घाणेरड्या भाषेत बोलतो… सगळ्यांसमोर बोलायलाही लाज वाटते… याचं वय काय, माझं वय काय, हा माझ्या बरोबरीचापण नाहीये… याच्या वयाचा माझा मुलगा आहे…

आरोपी – बरं ठिक आहे आंटी… !

पीडित महिला – आता आंटी झाली का… ?

महिलेचा पती – तेव्हा तर तू बायको म्हणत होता.. आत्ता आंटी बोलतोय… ?

तुझ्या @#@## तुझ्या… @@#@##@ तुझ्या…

यानंतर पीडित महिलेने थेट खेटराने या वासनांधाच्या डोक्यावरचं भूत उतरवायला सुरवात केली. महिलेने वारंवार या तरुणाला टाळण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने ते ऐकलं नाही. अखेर याच्या चोपण्याचा कार्यक्रमच महिला आणि तिच्या नातलगांनी हाती घेतला. भेटायला बोलावून मग जन्माची अद्दल घडवली. मथुराचा हा व्हिडीओ सध्या देशभरात व्हायरल होतोय  आणि यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI