चंद्राबाबूंचा बंगला पाडला, अवैध बांधकामांविरोधातील रेड्डींच्या कारवाईला सुरुवात

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार आज प्रजा वेदिका ही इमारत पाडण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

चंद्राबाबूंचा बंगला पाडला, अवैध बांधकामांविरोधातील रेड्डींच्या कारवाईला सुरुवात
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 8:19 AM

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार आज प्रजा वेदिका ही इमारत पाडण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रजा वेदिका ही इमारत माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडूंच्या अंदावल्ली स्थित घराचा विस्तारित कॉन्फरन्स हॉलचा भाग आहे. जगनमोहन रेड्डींनी याच इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची घोषणा केली.

जगनमोहन रेड्डी म्हणाले, “प्रजा वेदिका ही इमारत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नियमांचे उल्लंघन करुन बांधली होती. त्यामुळे या अवैध इमारतीविरोधात कारवाई करुन अवैध बांधकामांविरोधातील अभियान राबवले जाईल.

शनिवारी रेड्डी सरकारने नायडू राहत असलेली ही इमारत ताब्यात घेतली. नायडू सध्या आंध्र प्रदेशचे विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे या इमारतीवरील कारवाई ते कुटुंबासोबत विदेशात सुट्टीसाठी गेले आहे. रेड्डींच्या या निर्णयाला टीडीपीने राजकीय द्वेषातून सूडबुद्धीने केलेली कारवाई म्हटले आहे. तसेच रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करायला हवा, असंही नमूद केलं. टीडीपीचे विधानपरिषदेतील आमदार अशोक बाबू यांच्या मते, “सरकारी कर्मचाऱ्यांनी चंद्राबाबूंचं खासगी साहित्य बाहेर फेकलं. शिवाय सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती पक्षाला दिलेलीच नाही”

दुसरीकडे नगरविकास मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी टीडीपीवर हल्ला चढवला. “चंद्राबाबूंवर तशीच कारवाई होईल, जशी कारवाई जगनमोहन रेड्डींवर विरोधी पक्षनेते असताना झाली होती”, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना ‘प्रजा वेदिका’ ही इमारत सरकारी इमारत म्हणून घोषित करण्याची आणि विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थान करण्याची मागणी केली होती.

आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळे झाल्यानंतर, चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेश प्रशासनाचा कारभार हैदराबादवरुन अमरावतीला हलवला होता. तेव्हापासूनच चंद्राबाबू अमरावतीत राहात होते. त्यांनी या ठिकाणी 5 कोटी रुपये खर्चून ‘प्रजा वेदिका’ हे निवासस्थान उभारले होते. नायडू या ठिकाणी राहत होतेच, सोबत पक्षाच्या बैठकाही याच ठिकाणी होत असत.

आंध्रात सत्तापालट झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून चंद्राबाबूंची विशेष सुरक्षा काढण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून, या इमारतीचा बैठकांसाठी उपयोग करु द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच हे घर विरोधी पक्षनेत्याचे घोषित करा, अशी मागणी केली होती.

मात्र, सरकारने प्रजा वेदिका ही इमारत ताब्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. या इमारतीत जिल्हाधिकाऱ्यांचं संमेलन होणार आहे. त्याआधी हे संमेलन राज्याच्या सचिवालयात निश्चित करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.