आंबेडकर-ओवेसींची यारी, कुणाला पडणार भारी?

सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या दोन पक्षांच्या आघाडीची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामागची कारणंही तशीच आहे. कारण वंचित विकास बहुजन आघाडी नावानं तयार झालेल्या या आघाडीची व्यापकता दिवसागणिक वाढत जाते आहे. राज्यातील सर्वात मोठा असा मराठा समाज आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपवर नाराज आहे. या नाराज मराठा […]

आंबेडकर-ओवेसींची यारी, कुणाला पडणार भारी?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

सध्या ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या दोन पक्षांच्या आघाडीची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामागची कारणंही तशीच आहे. कारण वंचित विकास बहुजन आघाडी नावानं तयार झालेल्या या आघाडीची व्यापकता दिवसागणिक वाढत जाते आहे. राज्यातील सर्वात मोठा असा मराठा समाज आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपवर नाराज आहे. या नाराज मराठा समाजानं नव्या राजकीय पक्षाचीही घोषणा केली आहे. त्यातच कोरेगाव-भीमातील जातीय दंगलीनंतर संपूर्ण राज्यात वंचित आघाडीच्या माध्यमातून मागासवर्गीय आणि सर्वच वंचितांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणारे प्रकाश आंबेडकर आणि मुस्लीम समाजाचा राजकीय दबाव गट तयार करणारे असदुद्दीन ओवैसी एकत्र येणे, खरंतर सत्ताधारी भाजप-शिवसेनेसाठी आगामी काळात अडचणीचं ठरु शकते, असा अंदाज काहीजण लावत आहेत. पण त्याचवेळी भारिप आणि एमआयएमची आघाडीचा झटका हा भाजप किवा शिवसेनेपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसण्याची जास्त शक्यताही वर्तवली जातेय..

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारचा कार्यकाळ पाहिला, तर याचा अंदाज सहज लावला जाऊ शकतो. गोवंश हत्या बंदी कायदा किंवा तीन तलाक अशा काही निर्णयांनी मुस्लिम समाजात सरकारविरोधात रोष आहे, जो कोणालाही नाकारता येणार नाही. तर कोरेगाव-भीमा दंगल, ॲट्रोसिटी कायद्याचा खेळ, तसेच आरक्षणाविरोधी वाचाळवीरांच्या नसता उठाठेवींमुळे आंबेडकर अनुयायी तसंच मागासवर्गीयांच्या मनातही भाजपच्या विरोधात नाराजी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये असेही हे दोन्ही समाजघटक भाजपच्या विरोधात जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंबेडकरी समाज आणि मुस्लिमांची नाराज मते भाजपला पर्याय म्हणून काँग्रेस किंवा काही राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता आहे. पण त्यातच भाजपविरोधी या दोन्ही समाजघटकांना त्यांचे हक्काचे म्हणावेत असे भारिप आणि एमआयएम शक्तीचा एकत्रित पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी हे भाजपची हक्काचे वोटबँक नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मतदार वळवतील असा कयास लावला जातोय, जो बऱ्याच अंशी सत्यही वाटतो आहे..

पण, यामुळे थेट प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी आघाडीची भाजपची ‘बी टीम म्हणून हेटाळणी करणेही योग्य ठरणार नाही. कारण कोरेगाव-भीमाच्या दंगलीनंतर प्रकाश आंबेडकरांनी सुरु केलेला झंझावात आणि त्याला मागासवर्गीय, ओबीसी समाजाकडून मिळणारी साथ दुर्लक्षीत करण्यासारखी नाहीय. प्रकाश आंबेडकरांनी जिल्ह्यावार केलेली नव्या कार्यकर्त्यांची बांधणी, त्यांच्यासोबत जोडला जाणारा तरुण वर्ग पाहता, त्यांची ताकद वाढल्याचे सहज स्पष्ट होते. त्यामुळे त्यांना जर मुस्लीम समाजाची साथ मिळाली, तर येत्या निवडणुकीत या समीकरणाचे पडसाद उमटू शकतात. सोलापूर असेल, औरंगाबाद असेल या दोन्ही सभा तर माध्यमांनी अगदी जवळून पाहिल्या. त्यातली औरंगाबादमधील जनसागराच्या रेट्यानं माध्यमांना ही सभा लाईव्ह दाखवणंही भाग पडलं. त्यामुळे ही सगळी गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांसोबत आली आहे, असा अर्थ काढणे मूर्खपणाचे ठरु शकते.

प्रकाश आंबेडकरांची समाजकारण आणि राजकारणाचा अभ्यास करताना आपल्याला काही गोष्टी सहज लक्षात येतात. कुणाचाही हात धरुन मोठे होण्यापेक्षा स्वबळावर जनमत आजमावण्याकडे त्यांचा कल जास्त राहिला आहे. 1990 मध्ये त्यांनी विविध पक्षांची एकत्र मोट बांधून तयार केलेला भारिप बहुजन महासंघाचा अकोला पॅटर्न राज्यभर गाजला होता. अकोल्यासह अमरावती आणि नांदेडच्या किनवटमध्ये त्यांना यशही आलं. पण त्यानंतर हा पॅटर्न मर्यादित राहिला. पण सध्या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वानं कधी नव्हे एवढी व्यापक ओळख मिळवली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजाचा एकमेव सर्वमान्य नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. त्यांच्या एका हाकेवर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो आहे. एवढी ताकद आज त्यांच्याकडे आली आहे. त्यामुळेच आता त्यांचा या जनादेशाचे प्रतिबिंब मतदानयंत्रात उमटण्याचा इरादा आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून सोशल इंजिनियरिंग करत पुन्हा एकदा अठरा पगड जातींना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

प्रकाश आंबेडकरांच्या खेळीकडे बारकाईनं लक्ष दिल्यास,त्यांचं टार्गेट लक्षात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रणित भाजपचा हेच मुख्य टार्गेट असल्याचं दिसतंय. त्यामुळेच ते वेळोवेळी संघ आणि भाजपवर टीका करताना दिसतात. भाजपच्या विरोधातील गटांना एकत्र करण्यासाठीच ओवैसींना त्यांनी सोबत घेतले आहे. त्याचवेळी काँग्रेससोबत जाण्यासही नकार नसल्याचं आंबेडकर सांगतात. त्यासाठी फक्त त्यांना सन्मानजनक जागा हव्या आहेत. एकंदरीतच प्रकाश आंबेडकरांची खेळी ही भाजपसाठी फायदेशीर वाटत असली तरी, ती भाजपसाठी तेवढाच मोठा धोकाही ठरू शकते. कारण एमआयएम आधीच औरंगाबादमध्ये घट्ट पाय रोवून आहे. मुंबईतही एमआयएमचा एक आमदार आहे. तर इतर महाराष्ट्रातही एमआयएम हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे. तर प्रकाश आंबेडकरांचा देखील प्रभाव वाढत असल्याचे दिसते आहे.

अशावेळी हे दोन्ही नेते एकत्र आले आणि संभाजी ब्रिगेडसारख्या मराठा संघटनेचीही प्रकाश आंबेडकरांना साथ आहे. त्यामुळे हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर किंवा असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे महाराष्ट्रात गमावण्यासारखं जास्त काही नाही. त्यामुळे ही आघाडी दोन्ही पक्षांना फायदेशीर एवढे मात्र निश्चित आहे. लोकसभा किंवा विधानसभा जागा जिंकण्यात जरी प्रकाश आंबेडकर, ओवेसींचा वाटा मोठा नसला, तरी हे दोन्ही नेते प्रस्तापितांना पराभूत करण्यात मात्र मोठी भूमिका निभावू शकतात. फक्त या आघाडीचा फटका कोणाला जास्त बसेल, हे मात्र आज तरी निश्चितपणे सांगता येत नाही. पण महाराष्ट्रात राजकारणात याचे पडसाद उमटणार एवढं मात्र निश्चित.

– शरद जाधव, सिनियर प्रोड्युसर, टीव्ही 9 मराठी

(टीप : ब्लॉगमधील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.