काँग्रेसच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?

काँग्रेसच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?

ब्रम्हा चट्टे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. बांदिवडेकर हे भंडारी समाज महासंघाचा अध्यक्ष आहेत. त्यांनी सनातनचे साधक वैभव राऊतच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आहेत. काँग्रेस ऊठसूठ सनातनविरोधात प्रेस कॉन्फरन्स घेत असते आणि नेमकं सनातनच्या साधकाला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे विनायक राऊत […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

ब्रम्हा चट्टे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. बांदिवडेकर हे भंडारी समाज महासंघाचा अध्यक्ष आहेत. त्यांनी सनातनचे साधक वैभव राऊतच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आहेत.

काँग्रेस ऊठसूठ सनातनविरोधात प्रेस कॉन्फरन्स घेत असते आणि नेमकं सनातनच्या साधकाला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे विनायक राऊत आहेत. त्यांनी काँग्रेस कडून लढलेल्या निलेश राणे यांचा पराभव केला होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे पुत्र असणारे निलेश राणे हे त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडून म्हणजेच स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे सध्या उमेदवाराचा वानवा आहे. त्यामुळेच जातीय समीकरण डोक्यात ठेवून काँग्रेसने भंडारी समाजाचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. पण उमेदवारी देताना काँग्रेसला आपल्या विचारांचा विसर पडलेला दिसतोय. नाहीतरी एरवी पुरोगामीपणाचा ढोल काँग्रेस नेहमी बडवत असते पण कृतीत मात्र काँग्रेस त्या उलट करते. यापूर्वी अशी आगळीक काँग्रेसने केली आहेच.

जेम्स लेन प्रकरणात मनुवाद्यांची भूमिका घेणारे कुमार केतकर, जेम्स लेनच्या विकृत लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले केतकर, मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी लेखांची मालिका चालवलेले केतकर. मराठा समाज इतर समाजाचे कसे शोषण करतो अशी भूमिका मांडलेलं केतकर.

शिवस्मारकला प्रखर विरोध करत शिवाजी महाराजांबद्दल हिणकस तर संभाजी महाराजांबद्दल अपशब्द लिहिलेले केतकर. त्यानंतर शिवप्रेमींनी त्यांच्या घरावर शाई फेक केली. नंतर पुन्हा मराठा समाजाविषयी गरळ अनेक लेख लिहून शिवरायपर्यंत बोलायची मजल गेलेले केतकर.

छत्रपतींच्या बदनामीचे केंद्र असणारे भांडारकर फोडले तेंव्हा केतकरांनी मोठा तांडव केला होता.

खैरलांजीच्या वेळेस जनता रस्त्यावर उतरली, ट्रेन अडवली, डेक्कन क्वीन जळली (हिंसेचे समर्थन नाही) म्हणून महाराष्ट्रची शान जळाली, रस्त्यावर उतरलेल्या भीम सैनिकांना नक्षलवादी लेबल लावून बदनाम केले केतकरांनी.

भांडारकर संस्थेसाठी निधी जमवला केतकरांनी जे शिवक्रांतिवीर आहेत त्यांना दहशतवादी ठरवले केतकरांनी.

वेळोवेळी अशी जातीयवादी भूमिका घेतलेल्या केतकरांना काँग्रेसने राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं. मग असा हा पुरोगामीपणाचा बुरखा पांघरलेला पक्ष सनातनच्या साधकाला लोकसभेवर का नाही पाठवणार ? म्हणजे हिंदुत्वाच्या नावाने ओरडणारे हुसेन दलवाई यांनी या उमेदवारांची शिफारस केल्याचे समजते आहे. म्हणजे दलवाईंचा वारसा कोणता आहे याचा तरी त्यांनी किमान विचार करावा.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं काय चाललय त्यांनाच कळत नाहीये. कधी ते लोकसभा लढणार म्हणत होते कधी विधानसभा लढणार म्हणत होते.  आता त्यांचे नाव लोकसभेच्या यादी आहे. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या लोकांच्या कोंडाळ्यात असणाऱ्या केतकर यांना घेऊन सगळीकडे अशोक चव्हाण मिरवत असतात. किंबहुना अशोक चव्हाणांचे सल्लागार म्हणूनच केतकर वावरतात की काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आहे. आणि मग असा उच्चभ्रू बुद्धीचा सल्लागार असेल तर सनातनचा साधक उमेदवार का नाही होणार ?

फुले शाहू आंबेडकरांच्या  वारश्याचा जप करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा निषेध करावा तितका कमी आहे. यामुळेच म्हणावस वाटतय “काँग्रेसच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”

(सूचना : वरील ब्लॉगमधील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें