Budget 2022: काय 7 वर्षांची परंपरा तुटणार ? करदात्यांना मिळणार अनोखी भेट?  कलम 80 सी अंतर्गत सुट मिळणार?

करदात्यांना या वर्षात तरी कर सवलत आणि कर बचत वजावट मिळेल का या मुद्याने वातावरण तापले आहे. गेल्या सात वर्षात 1.50 लाखांची ही आडकाठी काही केल्याने हलेना. मात्र दुसरीकडे महागाईने कळस गाठला आहे. महागाईच्या चटके सर्वसामान्यांना बसत असताना सर्वसामान्य चाकरमान्यांना आता सरकारकडून कलम 80 सी अंतर्गत कर बचत वजावटीची मर्यादा वाढवून हवी आहे. निदान या अर्थसंकल्पाकडून तरी ही मोठी अपेक्षा आहे. 

 Budget 2022: काय 7 वर्षांची परंपरा तुटणार ? करदात्यांना मिळणार अनोखी भेट?  कलम 80 सी अंतर्गत सुट मिळणार?
Tax
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 12:26 PM

 Budget 2022: गेल्या तीन वर्षात महामारीने आणि महागाईने सर्वसामान्य चाकरमानी मेटाकुटीला आला आहे. भावनिक पातळीवर आणि आर्थिकस्तरावर तोंड देता देता त्याची सहनशीलता आवाज देत आहे. सरकारकडून वेळीच उपाय योजना करण्यात आल्या नाही तर  या असंतोषाला सरकारला तोंड द्यावे लागेल. एकीकडे वेतन कपात, कामबंदी यांना तोंड देत देत चाकरमान्याची गाडी रुळावर येत असतानाच जानेवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने भविष्याची चिंता सर्वसामान्य नागरिकाला सतावत आहे. महामारी आणि वाढती महागाई लक्षात घेऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकारने कलम 80 सी (Section 80 C) ची मर्यादा वाढवून किमान 2.5 ते 3 लाख रुपये प्रतिवर्ष करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातील चाकरमान्य करदात्यांचे कराच्या ओझाचा भार सरकारने उतरावावा अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारच्या या एका पावलामुळे करदात्यांसह सरकारला ही फायदा होईल. करदाते (Tax Slab) सढळ हाताने कर देतील आणि कर चुकवेगिरी कमी झाल्यामुळे सरकारचा ही फायदा होईल.

दहा वर्षात 50 हजारांची वाढ 

करबचतीसाठी अनेक करदाते कलम 80 सी लाभ घेतात.  आर्थिक वर्ष  2013-14 पर्यंत आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध असलेली जास्तीत जास्त वजावट एका वर्षात 1 लाख रुपये होती. त्यानंतर 2014-15 या आर्थिक वर्षात वजावटीची ही मर्यादा वर्षाला 1.5 लाख रुपये करण्यात आली. तेव्हापासून अनेकदा ही मर्यादा वाढविण्याची मागणी देशभरातून करदात्यांनी केली. मात्र गेल्या सात वर्षात या मर्यादेत वाढ करण्यात आली नाही. 2019 पासून तर सर्वसामान्य जनतेला महामारी आणि महागाईचा मारा सहन करावा लागत आहे. या दुहेरी कात्रीत अडकलेल्या करदात्यांनी यावेळी कर बचतीसाठी मर्यादा वाढवून देण्याची आग्रही मागणी केली आहे.  अनेकांचा खर्च वाढला, पगार वाढला नाही उलट तो कमी झाला आहे, मात्र कलम ८० सी चा लाभ एकगठ्ठा वाढलेला नाही. दरवर्षी करदात्यांकडून कर बचतीसाठी वजावटीची मर्यादा वाढविण्याची आणि लाभ देण्याची मागणी लावून धरण्यात येते.

कलम 80 सी लाभ

कलम 80 सी अंतर्गत वजावट केवळ व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी उपलब्ध आहे. कर बचतीसाठीचा हा पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहे. .एखादी व्यक्ती कलम 80 सी अंतर्गत केवळ काही बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर किंवा त्यामध्ये सूचीबद्ध विशिष्ट खर्च करण्यासाठी वजावटीचा दावा करू शकते. करदाता जास्तीत जास्त वजावटीचा फायदा उठवण्यासाठी गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतो. त्यामध्ये वार्षिक 1.5 लाखांपर्यंत ही गुंतवणूक करता येऊ शकते. वर्षभरात करदात्याने करपात्र गुंतवणुकीचा एकत्रित विचार केल्या जातो. त्यानंतर करदाता वजावटीचा दावा करु शकतो. यासंबंधीची सर्व गुंतवणुक पुरावे त्याला सादर करावे लागतात.

कलम 80 सी अंतर्गत करबचतीचे प्रमुख पर्याय

1. जीवन विमा हप्ता

2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील योगदान

3. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधीमधील योगदान

4. गृहकर्ज

5. घर खरेदीसाठी भरलेले मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क

6. ईएलएसएस अथवा कर बचत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

7. सुकन्या समृद्धी खाते योजनेतील गुंतवणूक

8. मुलांचे शिकवणी शुल्क

9. 5 वर्षांची कर बचत बँक किंवा पोस्टल फिक्स्ड डिपॉझिटमधील गुंतवणूक

10. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूक

हे सुद्धा वाचा:

महारेशीम अभियानाचा उद्देश साध्य, आता उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा ?

Pune crime| अबब! थोडे थोडकी नव्हेतर 3800 किलो तंबाखू जप्त ; पुणे पोलिसांनी इथे केली करवाई

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.