गौतमवरील गंभीर आरोप ‘आप’वरच उलटणार?

देशाची राजधानी दिल्लीत येत्या 2 दिवसात सात जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा अनेक दिग्गज सिनेकलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज गौतम गंभीर. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकार मारणारा गंभीर सध्या पूर्व दिल्ली या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतोय. भाजपने गौतम गंभीरला तिकीट दिले आहे. आम आदमी पार्टीकडून […]

गौतमवरील गंभीर आरोप 'आप'वरच उलटणार?
Namrata Patil

|

Jul 05, 2019 | 3:46 PM

देशाची राजधानी दिल्लीत येत्या 2 दिवसात सात जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा अनेक दिग्गज सिनेकलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज गौतम गंभीर. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकार मारणारा गंभीर सध्या पूर्व दिल्ली या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतोय. भाजपने गौतम गंभीरला तिकीट दिले आहे. आम आदमी पार्टीकडून गंभीरविरोधात अतिशी मारलेना आणि काँग्रेसकडून अरविंदर सिंह लवली उभे आहेत. पण ऐन मतदानाच्या तोंडावर गौतम गंभीरवर आपकडून सनसनाटी आरोप केलाय, ज्यामुळे राजधानीतलं वातावरण तापलंय.

आम आदमी पार्टीचे नेते अतिशी मार्लेन या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गौतम गंभीर यांच्याविरोधात अतिशी निवडणूक लढणार आहे. अतिशी या व्यवसायाने शिक्षिका आहेत. निवडणुकीच्या दोन दिवसाआधी राज्याच्या विकासाचे मुद्दे उठायला हवे, पण येथे मात्र दुसरंच प्रकरण चर्चेत आहे. चुकीचं समजू नका…हे आहे पत्रक वाटण्याचं प्रकरण. दिल्लीत काही पत्रकं वाटण्यात आलीत, ज्यात अतिशी यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर लिहिण्यात आलंय. याचा आरोप आपने गौतम गंभीरवर केलाय. हे पत्रक मी देखील वाचलं. डोक नसलेल्या कोणी एकाने हे पत्र लिहिले असावे असं मला वाटत.

मतांसाठी राजकारण

अतिशीच्या आई-वडिलांचा धर्म, त्यांचे कुण्या शिक्षकांशी असलेले संबंध आणि मनीष सिसोदियांशी जवळकी या सर्व बाबी पत्रकात लिहिल्या आहेत. या सर्व गोष्टींचा फायदा मतासांठी होण्याची शक्यता फार कमी असल्याचे मला तरी वाटते. त्यातच अतिशी आणि गंभीर या दोघांचीही ही पहिलीच निवडणूक…यामुळे मतांसाठी अतिशीनी थेट रडत रडत गंभीरचे नाव घेतल्याची शक्यता आहे. यानंतर गंभीरनेही माझ्यावर ‘ही पत्रक वाटल्याचा आरोप सिद्ध झाल्यास मी उमेदवारी मागे घेईल’ असे जाहीर केलंय.

पत्रक वाटण्याची गंभीरला गरज काय?

या सर्व प्रकरणात एकीकडे स्टार सेलिब्रिटी असलेल्या गौतम गंभीरच्या प्रचारातील रोड शोसाठी तुफान गर्दी होत आहे. प्रचारादरम्यान त्यांचा फोटो, ऑटोग्राफ, सेल्फी घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचे नेत्या अतिशी मार्लेन यांना फारसं कोणी ओळखत नाही. अतिशीचा जनसंपर्क फार कमी आहे. त्यामुळे अतिशी यांच्याविरोधात अशी पत्रकं काढण्याची गंभीरला गरज काय? असा प्रश्न मला पडला आहे.

तसेच अतिशीने इतक्या विश्वासाने पत्रकार परिषदेत गंभीरवर ताशेरे ओढलेत. आतापर्यंत असं काहीही झाल्यास उमेदवार सर्वप्रथम निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात. मात्र अतिशीन असं काहीही केलेलं नाही. दिवसेंदिवस प्रकरण वाढत जाणार हे लक्षात घेऊन नंतर अतिशीने आज दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली. आता त्यातही गंमत म्हणजे, दिल्लीतील महिला आयोगाची अध्यक्ष स्वाती मालीवाल या देखील त्यांच्या पक्षाच्या आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणानंतर गौतम गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अतिशी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात खर कोण खोट कोण हे समोर येईलचं, मात्र आतापर्यंत अनेकदा महिलांच्या नावावर घाणरेडे राजकारण खेळले जात आहे. त्याचा फायदा मतांसाठी करण्यात येतो हेही अनेकदा समोर आहे. त्यामुळे दिल्लीतील हे प्रकरण त्याचाचा एक भाग नाही ना असा प्रश्न आता मला पडला आहे.

नेमकं प्रकरणं काय ?

माजी क्रिक्रेटर आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आणि शिक्षणतज्ज्ञ आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केलाय. गौतम गंभीर निवडणूक जिंकण्यासाठी माझ्याविरोधात अश्लील पत्रके वाटत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला. या पत्रकांमध्ये आप नेत्या आतिशी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या आईविरोधात अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा वापर करत काही लेखन करण्यात आलंय. सध्या या पत्रकांमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालयं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें