नायकांचो वाडो

नायकांचो वाडो

‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’ ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत आसातच. सध्या फक्त कोकणात नायतर संपूर्ण महाराष्ट्रात एका वाड्याची चर्चा जोरदार चालू हा. २२ फेब्रुवारी २०१६ मध्ये झी मराठी वर चालू झालेल्या रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेन नुसतो धुमाकूळ घातल्यान होतो. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’ ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत आसातच. सध्या फक्त कोकणात नायतर संपूर्ण महाराष्ट्रात एका वाड्याची चर्चा जोरदार चालू हा. २२ फेब्रुवारी २०१६ मध्ये झी मराठी वर चालू झालेल्या रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेन नुसतो धुमाकूळ घातल्यान होतो. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आणल्यानी. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत इली. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रा तर फेमस झाली पण त्यापेक्षाही वरचढ ठरली पांडू आणि सुशल्या..

ही मालवणी भाषा नाय, दाखवतत त्येना कोकण पर्यटनावर परिणाम होतलो अशी कारणा सांगत लोकांनी ह्या मालिकेक सुरुवातीक लय विरोध केलो होतो. ह्या मालिकेतून भूत-प्रेत आत्म्यांसारख्या अंधश्रध्दांका खतपाणी गावता त्यांच्यातून  कोकणाची बदनामी होता म्हणून राजकीय आंदोलना पण  झाली होती हुती.  चिपळून पोलिस स्टेशनमध्ये तर मालिकेविरोधात तक्रार करून पण मोकळे झाले. तरीपण कुतूहल म्हणा वा अजून काही पण हेंचो ‘खेळ’ बघूचो प्रेक्षकांनी सोडल्यानी नाय. उलट पाहिलो सिझन संपलो आणि प्रेक्षक दुसऱ्या सिझन ची वाट बघुक लागले.

युवा ब्लॉगर : नितीन नाईक, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातल्या कुडाळ आकेरी मधल्या शेटकर हेंच्या मालकीच्या वाड्यातच “रात्रीस खेळ चाले” चा शूटिंग झाला. हेच्यापूर्वी ह्या  वाड्यात ‘ महानंदा’ व ‘ गांरबीचा बापू’ ह्या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण केल्यानी होता. सिंधुदुर्गातले अनेक नैसर्गिक सौंदर्याची लोकेशन्स तशीच थयसरल्या लोकांनी कल्पकतेने बांधलेली जुनी घरा ती सिने, मालिका निर्मात्यांका आकर्षित करतत. पहिल्या सिझन चा शूटिंग चालू असताना रोज १०० च्या वर पर्यटक ह्या वाड्याक भेट होते. शूटिंग संपला तरी याक पर्यटन स्थळ म्हणूनच लोका नाईकांचो फेमस होतो.

अलीकडेच रात्रीस खेळ चालेचा दुसरो सिझन चालू झालो हा. पहिल्या सिझन मध्ये पहिल्याच भागात अण्णा गेले असा दाखवल्यानी आणि कथानक पुढे नेल्यानी पण ह्या सिझन मध्ये मात्र अण्णांचो पूर्ण जीवनपटच दाखवतले हत. पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाक डोक्यावर घेतल्यानी. गेल्या सिझन मध्ये सुशल्या तर ह्या सिझन मध्ये लहानपणी छाया दाखवलेला मिताली साळगावकर ह्या लोकांच्या मनावर राज्य करता हा. Viral व्हिडिओ मुळे फेमस झालेला ह्या पोरग्या आज tv वर बघताना आमच्यासारखो मालवणी माणूस नक्कीच सुखावता हा. अण्णांची दहशत दिसता हा आणि ह्या दहशतीमध्ये अण्णा काय काय करू शकतत ह्या लेखक प्रल्हाद कुडतरकर ने अचूक लिहिला हा.

राजू सावंत दिग्दर्शक म्हणून काम बघतत त्यांनी नवीन कलाकार कसे तयार होतील ह्यावर जास्त लक्ष दिल्यानी ही कौतुकास्पद गोष्ट हा. कलाकारांचा म्हणाचा तर माधव अभ्यंकर (अण्णा), अनिल गावडे (गुरव), प्रल्हाद कुडतरकर (पांडू), शकुंतला नरे ( माई), मिताली साळगावकर (लहानपणीची छाया) हेंनी जबरदस्त काम केल्यानी हा.

घरातली भाऊबंदकी, कौटुंबिक संबंध आणि त्याचे आई- मुलांवर होणारे परिणाम हे ह्या मालिकेतुन आमकां बघुक मिळतले. बाकी रात्रीस खेळ चाले च्या संपूर्ण टीम ला आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या राजू सावंत हेंका आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें