महापौर है हम…

महापौर है हम...

ठिकाण – मुंबई ते लखनऊ विमान 23 Nov 2018 वेळ- 11.50 मुंबई विमानतळ संपूर्ण विमानात घोषणा सुरु होत्या…”जय श्रीराम”… “हर हिंदु की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार”… एरवी विमानात अगदी सफाईदारपणे वावरणाऱ्या एअर हॉस्टेस भांबावल्या होत्या… मुंबई ते लखनऊ जाणारे आणि राजकारणाशी संबंध नसलेले प्रवासी नाकं मुरडत होते… यात भर म्हणजे ‘पहले काम फिर […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

ठिकाण – मुंबई ते लखनऊ विमान 23 Nov 2018 वेळ- 11.50 मुंबई विमानतळ

संपूर्ण विमानात घोषणा सुरु होत्या…”जय श्रीराम”… “हर हिंदु की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार”… एरवी विमानात अगदी सफाईदारपणे वावरणाऱ्या एअर हॉस्टेस भांबावल्या होत्या… मुंबई ते लखनऊ जाणारे आणि राजकारणाशी संबंध नसलेले प्रवासी नाकं मुरडत होते… यात भर म्हणजे ‘पहले काम फिर राम’ म्हणाणारे आम्ही पत्रकार… शिवसैनिकांचे बाईट्स, घोषणा देतनाचे व्हिजुअल्स घेण्यात बिझी होतो… इतक्यात विमानात आले मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर… अत्यंत साधा माणूस म्हणून महाडेश्वर सर्वांना परीचित आहेत…

सध्या मुंबईचे महापौर महोदय खुप चर्चेत आहेत… महापौर राणीच्या बागेत राहायला जाणार की राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे शिवाजी पार्कलाच दुसऱ्या जागेत जाणार याची चर्चा मुंबईत च्युईंगमपेक्षा जास्त चघळली जातेय… असो.

तर त्याचं झालं असं की अयोध्येला जाण्यासाठी आमच्या मुंबईचे महापौर विमानात नेहमीप्रमाणे हसतमुख चेहऱ्याने विमानात आले… येताना आज जरा जास्त विजयी मुद्रा दिसत होती. कारण ही एकदम जॉन सॉरी जान आणणारं होतं… महापौर विमानात चढताच बिझनेस क्लासमध्ये पहिल्या सिटवर बसलेल्या एका उंचपुरया रुबाबदार व्यक्तिनं विश्वनाथ महाडेश्वरांना नमस्कार केला. ती व्यक्ति आणि महापौर यांच्यातील संभाषण असं होतं…

मुंबईचे महापौर विमानात येतात…

व्यक्ती- हसते आणि मानेनं स्वागत करते

व्यक्ती – Hello sir

महापौर- नमस्कार

व्यक्ती- महापौरांना हात मिळवते

महापौर-(हात मिळवत) Do u know me

व्यक्ती- Yes sir You are Mayor of Mumbai… Everybody knows you…

महापौर- आपण

व्यक्ति- “Sir I am John Abraham”

आता जॉनला विमानात मुंबईच्या खड्ड्यातून जात असल्याचा भास होत दिवसा तारे दिसले असतील… आता हाडाचे शिवसैनिक असलेले आपले महापौर या प्रसंगानंतर शांत कसे बसतील? विमानाच्या सीटवर बसल्यावर आपण पिक्चर कसे बघत नाही आणि जॉन अब्राहम मला कसा ओळखतो ते सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भाव दिसत होते की “महापौर है हम”

– पंकज दळवी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें