सिलेक्शन बिफोर इलेक्शन,सोशल मीडियातून निवडणुकीआधीची निवड!

  • Updated On - 4:12 pm, Fri, 5 July 19 Edited By: Team Veegam
सिलेक्शन बिफोर इलेक्शन,सोशल मीडियातून निवडणुकीआधीची निवड!

अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक

2019 च्या लोकसभा निवडणूकीत 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2019 ची ही लोकसभा निवडणूक जगातील सर्वात मोठा ‘वोटिंग इव्हेंट’ आणि  डिजिटल डेमोक्रेसीकडे एक विधायक पाऊल आहे. गेल्या काही वर्षात राजकारणात सोशल मिडियाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलंय, 2012 च्या अमिरेकेतील राष्ट्रपती निवडणूक, ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसनारो यांचं मोठं व्हॉट्सअॅप अभियान आणि फिलिपींन्स चे राष्ट्रपती रोड्रिगो डुटर्ट यांनी केलेला मोठ्याप्रमाणात फेसबुक प्रचाराने जगात सोशल मिडियाची वेगळी ओळख निर्माण केलीय. याच निमित्तानं सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकीय प्रसार, प्रचार आणि त्याचा फायदा लोकांच्या लक्षात आला. यात भारतंही मागे नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऑनलाईन बाजार असलेल्या भारतातंही सोशल मिडियाचा मोठा  सर्वस्तरावर वापर होतोय. या लोकसभा, विधानसभा व इतर निवडणूकीत देशातील विविध राजकीय पक्ष मोबाईल अप्लिकेशन, वेबसाईट, ब्लॉग आणि सोशल नेटवर्किंग साईटचं हत्यार घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेय. डिजिटल डेमोक्रसीकडे भारताचं हे मोठं पाऊल आहे.

‘सिलेक्शन बिफोर इलेक्शन’ म्हणजे निवडणूकी पूर्वीची निवड, राजकीय पक्ष जे उमेदवार देतात ते सर्व मतदारांना मान्य असतात की नाही व मतदारांना उमेदवार निवडायचा अधिकार आहे का  ?

ज्या प्रमाणे लोकप्रतिनिधी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन घरा घरात जाऊन आपला प्रसार, प्रचार, आश्वासनं देऊ शकतात. त्याच प्रमाणे सामान्य लोकांना आपलं मत, त्यांची इच्छा राजकीय पक्ष आणि नेत्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. बऱ्याचदा सर्वसामान्य मतदारांची एखाद्या पक्षाला पसंती असते, पण त्या पक्षानं दिलेल्या उमेदवाराला पसंती नसते किंवा या उलट.  त्यामुळे उपाय म्हणून  सोशल मीडियाचा प्रभावी व धोरणात्मक  वापर करुन उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी, ‘सिलेक्शन बिफोर इलेक्शन’च्या माध्यमातून जनतेची निवड, ज्येष्ठ नेते आणि राजनैतिक दलांकडे पोहचवती करता आली पाहिजे .    सर्वसामान्य जनता व दलांतर्फे निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेमध्ये  थेट संपर्क असायला हवा, जनतेच्या निवडीचा , निकषांचा सर्वदूर विचार केल्यास आपली लोकशाही पारदर्शी आणि अधिक बळकट होण्यास मदत होईल. समाजकारण राजकारणाचा केंद्रबिंदू व्हावा, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड  प्रयत्न केलेत. याद्वारे आर्थिक, सामाजिक मागास आणि पीडित-शोषीत समाजाला न्याय आणि सन्मान देणारी सत्ता स्थापीत होईल, हाच बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू होता. राजकीय पक्षांनी कुठल्याही विचारधारेचा अवलंब करताना समाजाच्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर नेहमी प्रयत्नशील होते व आज बऱ्यापैकी सर्वपक्षिय तसे चित्र दिसून येत आहे. आज दुर्बल, ग्रामीण, वंचित नेतृत्त्व प्रखरतेने प्रमुख राजकीय प्रवाहात नेतृत्त्व उदयास आले आहे. पण अजूनंही खुप प्रयत्न गरजेचं आहेत . उमेदवार निवडतांना सर्व सोशीत , वंचित व दुर्बल घटकांना सुद्धा निर्णयात्मक भूमिकेत घेणं आवश्यक आहे, ज्यासाठी दुतर्फा सोशल मीडिया चा वापर‘सिलेक्शन बिफोर इलेक्शन’च्या माध्यमातून होऊ शकतो .

डिजिटल डेमोक्रेसी कडे वाटचाल – सर्व रामूच्या भारत निर्माण

जगातली नावाजलेली स्टॅटिस्टा.कॉम (stastista.com) या संस्थेच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये भारतात 313.6 दशलक्ष फेसबूक युजर्स आहेत. याच संस्थेच्या आकड़ेवारीनुसार आपल्या देशात साधारण 373.88 दशलक्ष स्मार्टफोन युजर आहेत. फायनान्शीयल एक्सप्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 200 दशलक्ष पेक्षा जास्त लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅप मेसेज इक्रप्टेड (Encrypetd) राहतात. त्यामुळेच त्या मेसेजेसची वास्तवीकता न तपासता अशे असंख्य मेसेज अफवांसह समाजात व्हायरल होतात. याचे अनेक वाईट परिणाम होतात. या घटना आपला सामाजिक सलोखा आणि देशातील शांतीसाठी धोकादायकंही ठरु शकतात. त्यामुळे सरकारनं कठोर पावलं उचलत कायद्याने व्हॉट्सअॅप मेसेजला फक्त पाच ग्रुपपर्यंत सिमीत केलंय. सोशल मीडियामुळे समाजाला काही विशेष उद्देशांसाठी प्रभावीत करु शकते व सद्य दशा, दिशा बदलू शकते. याचा प्रत्येक वेळेस चांगलाच परिणाम होईल, याची शाश्वती नक्कीच देता येत नाही. पण ‘सिलेक्सन बिफोर इलेक्शन’ सारख्या सकारात्मक प्रयत्नाने माईक्रो कॅम्पेनिंगकरुन अधिक प्रभावीपणे राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनता त्यांची निवड आणि अपेक्षा, याबाबत थेट दोन्ही बाजूनं संवाद साधू शकतो. ज्यात जनता चांगल्या पद्धतीनं आपलं योगदान सत्तेच्या आणि समाजाच्या हितासाठी देऊ शकेल. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, प्रचारक आणि उमेदवार थेट जनतेशी जुडणार, आणि देशहिताच्या दिशेनं 24 X 7 सर्वांच्या संमत्तीनं, सर्व वर्गातील लोक राजकारण, सत्ताकारण आणि समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात येणार आणि याच निमित्तानं खऱ्या अर्थानं ‘इलेक्शन बिफोर इलेक्शन’ निर्णयात्मक साधन होईल. अंतपक्षीय राजनीतीचा फटका जवळपास सगळ्याच राजनैतिक पक्षांना पडला आहे , थेट जनतेच्याच निर्णयाला अनुसुरां उमेदवारांची मांडणी झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना अधिक पारदर्शी , प्रभावी मार्गानी जनतेची सेवा करता येईल यात दुमत नाही .

स्वस्त स्मार्टफोन, स्वस्त आणि चांगली स्पीड असलेला इंटरनेट डाटा, आणि भारतीय लोकांमध्ये सोशल मीडियाचा मोठा वापर, हे सर्व राजकीय पक्षासाठी निवडणूक-राजकिय संवादाचं प्रभावी साधन आहे. आधीच्या काळापेक्षा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तीक स्थरावर अधिक प्रभावशाली आणि रचनात्क संवाद होऊ शकतो. जाहीरनामा, व्हिडीओ, वेगवेगळे अॅनिमेशन्स, वैयक्तीक आश्वासनं व नियोजन , फोटोज आता थेट प्रत्येक व्यक्तीपर्यंत मोबाईल,  मतदारांपर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचू  शकतात. पूर्वी यासाठी जास्त वेळ, पैसा आणि मणुष्यबळ लागत होतं,   ” सिलेक्शन बिफोर इलेक्शन”  ने खऱ्या अर्थाने जनतेतून उमेदवार निवडून येईल आणि निवडणूक विजयी होऊन प्रस्थापित राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकांची, समाजाची आणि देशाची खऱ्या अर्थाने सेवा करु शकेल. सोशल मीडियाने राजकीय संवादासाठी एक प्रभावी माध्यम दिलंय, हेच माध्यम ‘डिजिटल डेमोक्रसी’कडे घेऊन जाणार, आणि आपला देश जगात वैश्विक महासत्ता बनेल व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेला सर्व रामूच्या भारत निर्माण होईल., जिथे पंचायत ते पार्लमेंटपर्यंत नागरिक, जनता जनार्दन व सत्तीय पक्ष सार्वभौमित्तिक यंत्रणा चालवतील.

(सूचना : वरील ब्लॉगमधील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)