BLOG : निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ आणि जबाबदार नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबतचे दावे प्रतिदावे केला जात आहेत.

BLOG : निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच
Follow us
| Updated on: Jul 01, 2019 | 6:26 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून 3 ते 4 महिने बाकी आहे. निकाल काय लागेल हे अजूनही कुणालाच माहित नाही. पण निवडणूक निकालाआधीच शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे. काही करून यंदा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे. त्यासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केल्याची चर्चा होती. आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळं ठाकरे घराण्यातील पहिलाचं व्यक्ती थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच सत्तेत समान वाटा हवा असल्याचं विधान शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांसमोरच  केलं.  तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावरून आमचं ठरलं असल्याचं विधान केलंय. भाजप नेते मात्र पुढील मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं म्हणत आहेत. शिवसेना भाजपचे नेते मुख्यमंत्रीपदावरून उघड चर्चा करत असल्यामुळं दोन्ही नेत्यांनी आमदारांची समन्वय बैठक घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा थांबल्या आहे. मात्र अंतर्गत धुसफूस सुरुच आहे.

गेल्या काही दिवसात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत राजकीय घडामोडी वेगानं घडताना दिसत आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ आणि जबाबदार नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबतचे दावे प्रतिदावे केला जात आहेत. एवढचं काय शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावून कोणी काहीही म्हणो, शिवसेना भाजपचं ठरलं असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांची री ओढत उद्धव ठाकरेंनीही आमचं ठरलं असल्याचं सांगितलं. पण सत्तेत समसमान वाटा हवा असल्याची उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसमोरच रोखठोक भूमिका जाहीर केली. आता सत्तेत समसमान वाटा  हवा अशी जाहीर भूमिका घेणा-या उद्धव ठाकरेंना काय म्हणायचं आहे हे मुख्यमंत्र्यासह सर्वानाच कळलं. कारण आधीच शिवसेना भाजपात ५०-५०चा फॉर्म्युला ठरला असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलं.

दोन्ही पक्ष विधानसभेत समान जाागा लढणार तर मग सत्तेतही वाटा समान हवा  हीच शिवसेनेची भूमिका आणि तीच भूमिका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. उद्धव ठाकरेंचा समान सत्तेत वाटा याचा अर्थ मुख्यमंत्रीपद शिवसेनेला हव हेच त्यांनी सूचीत केलं. अप्रत्यक्षपणे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवंय अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली…मग ते अडीच वर्षासाठी का असेना. पण शिवसेनेला मुख्यमंत्रपद हवं. यावर शिवसेना ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंच्या देहबोलीतून दिसत होतं… यंदा कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचा माणूस हवाय यावर सर्वांचं एकमत झाल्याचं दिसतंय…..कारण गेल्या काही दिवसातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची विधानं आणि त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरेंचं विधान तरी त्याकडेच इशारा करतेय……शिवसेनेचं मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं. मग मुख्यमंत्री करायचं कुणाला तर तेही शिवसेनेचं ठरल्याचं दिसतंय. कारण शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलं जातंय. शिवसेनेकडून तशी हवा निर्माण केली जातेय. त्यामुळंच आदित्य ठाकरे आता मुंबई आणि मुंबई बाहेरल सर्वच लहान मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावू लागलेत.

एवढंच काय उद्धव ठाकरे दिल्ली दौ-यात आदित्य ठाकरे यांना घेऊनच जातात.  दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आदित्य यांना सोबत घेऊन केल्या जातात. अमित शाहांची भेट असो की नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे असतातच.. नुकत्याच पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना सोबत नेलं. नुसतं सोबत नेलं नाही तर मोदींचा सत्कार आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून केला. मोदींनी आदित्य ठाकरेंसोबत हस्तादोलनं केलं. संपूर्ण भारतानं  ती घटना पाहिली आणि तेव्हापासूनच आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका पार पाडणार हे  बहुदा स्पष्ट झालं असावं.

केंद्रात एकच मंत्रीपद मिळाल्यानं नाराज शिवसेनेनं पुन्हा अयोध्या दौरा काढून भाजपला इशारा दिला होता. त्यावेळीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे होतेच. त्यावेळी शिवसेनेचे चाणक्य संजय राऊत यांनी अतिशय सूचक ट्विट केलं. आदित्य ठाकरे तुझी महाराष्ट्र वाट पाहतोय. आता संजय राऊत यांना या ट्विटवरून आगामी काळात आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी सज्ज झालेत हेच सांगायचं होतं. संजय राऊत यांच्या ट्विटमुळंच आदित्य ठाकरे यांचं नाव पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी जोर धरू लागलं.

शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर चेहरा हवा आणि तो चेहरा आदित्य ठाकरेचा असल्याचं सध्या तरी दिसतंय….त्यामुळं  गेल्या 53  वर्षाची शिवसेनेची किंबहुना ठाकरे घराण्याची थेट सत्तेत सहभागी न होण्याची परंपराही  मोडली जाणार याचे संकेत सध्या मिळत आहेत.  कारण शिवसेनेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत ठाकरे घराण्यातील कुणीही प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलं नाही. ठाकरे घराण्यानं कायम सत्तेच्या बाहेर राहून सत्ता चालवली.

प्रत्यक्ष सत्तेत सहभागी न होता सत्तेच्या चाव्या मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत:कडेच ठेवल्या होत्या. तोच कित्ता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे चालू ठेवला. सत्तेच्या केंद्रस्थानी कुणीही असलं तरी सत्तेची सर्व सूत्रं मातोश्रीवरूनच चालत होती आणि आजही चालत आहेत. मात्र आता शिवसेनाल दुहेरी सत्ता केंद्र नको असंच वाटायला लागल असल्याचं दिसतंय. त्यामुळं रिमोट कंट्रोल बनवून सत्तेवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष सत्तेत सहभागी व्हावं असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांना वाटतंय.

त्यामुळं गेल्या विधानसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं.  यंदा मात्र आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार असल्याचं शिवसेनेनं ठरवलंय. त्यामुळं 53 वर्षांपासून सुरु असलेली रिमोट कंट्रोलची परंपरा शिवसेना यंदा मोडण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांची चिरंजीव आदित्य ठाकरे शिवडी मतदार संघातून विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय.  आदित्य ठाकरे यांनी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यास उपस्थिती लावून तसे संकेत दिलेत. मात्र अधिकृत भूमिका शिवसेनेकडून योग्य वेळी जाहीर केली जाईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि पदाधिका-यांची देहबोली आदित्य ठाकरे राज्याचा भावी मुख्यमंत्री आहे हेच सांगतेय..

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे यांच्या अनेक प्रचार सभा झाल्यात. या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी  पक्षाच्या उमेदवारांसाठी केलेला प्रचार प्रभावी ठरलाय. त्यांचं  वक्तृत्व तसं प्रभावी नसलं तरी भाषण देण्याची जाण आणि मुद्दे मांडण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. विरोधकांवर टीका करताना त्यांनी दाखवलेला संयमीपणाही त्यांच्या भाषणातून दिसतोय.  आदित्य ठाकरे यांच्या भाषणातून विरोधकांवर प्रहार तर केला जातोय. मात्र भाषेची मर्यादा सांभाळली जातेय. त्यांच्या भाषणातून कुठे ही आक्षेपार्ह  शब्द आला नसल्याचं दिसलंय.  गेल्या  ५ वर्षात आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध भागात दौरे केले. त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला. त्यातून आदित्य  ठाकरे घडत गेले. किंबहुना त्यांना तयार केलं जातंय.

आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं हे शिवसेनेचं ठरलं असल्यानं त्यासाठी शिवसेनेतेच नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक कामाला लागलेत. आणीबाणीची परिस्थिती ओढावली तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आडकाठी होऊ नये याासाठी उद्धव ठाकरे यांनी मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन आदित्य ठाकरेंना दिल्लीत सोबत नेलं आणि मोदी आणि शाहा यांच्या पुढे उभं केलं. जेणेकरून उद्या तशी वेळ आली तर मोदींना आणि अमित शाहांना आदित्य  ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास अडचण येऊ नये.  जर आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस राज्यात काय करणार हाही प्रश्न आहेच. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास फडणवीस उपमुख्यमंत्री तर नक्कीच होणार नाही. देवेंद्र फडणवीस हे मोदी आणि शाहांच्या जवळचे आणि विश्वासातील असल्यामुळं त्यांचं केंद्रात महत्त्वाचं खातं देऊन पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे. पण ही जर आणि तर ची घटना आहे.

आता गोष्ट भाजपची. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा होऊ लागल्यानंतर भाजप नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेच्या वर्धापनदिनात मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा गौण असल्याचं सांगणारे मुख्यमंत्री मात्र भाजपचाचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सांगतात. कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच मुख्यमंत्री असणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितलं असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या दोन मुख्यमंत्र्यांच्याच्या विश्वासू नेत्यांनी पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं रोखठोक भूमिका जाहीर केलीय. तसेच भाजपचे प्रवक्त्येही मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं सांगताहेत.

गिरीश महाजन यांची मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागली. उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतल्यानंतर गिरीश महाजन यांना मातोश्रीवर जावून दिलगिरी व्यक्त करावी लागल्याची माहिती आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातूनही  भाजपवर मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेल्या वादावर जाहीर टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रीपदावरून निकालाआधीच शिवसेना आणि भाजपात महाभारत सुरु  झालं आहे.  त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पहिला प्रश्न म्हणजे लोकसभेसाठी युती करताना अमित शाहांनी खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का?.  शिवसेना-भाजपच मुख्यमंत्रीपदावरून ठरलं असं सांगितलं जातं. पण काय ठरलं हे कुणीचं सांगत नाही. शिवसेना -भाजपचं काय ठरलं हे कुणी सांगितलं का? खरंच अडीच अडीच वर्षासाठी शिवसेना-भाजप मुख्यमंत्रीपद घेणार आहे का? कुणाच्या कितीही जागा निवडून येऊ दे सत्तेत दोन्ही पक्षांना समान वाटा मिळणार आहे का? शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदित्य ठाकरे आहे का? आदित्य मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का?

(ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.