पंचायत ते पार्लियामेंट : सोशल मीडियाच ठरवणार निवडणुकांची दिशा आणि दशा

कोणत्याही संघटनेचा आणि पक्षाचा मूलमंत्र हा सर्वांना सामावून घेणारा म्हणजेच “सर्व स्मूचय ” असला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे “विभूती पूजन” नसलेल्या संघटनांचे प्रचार, प्रसार आणि यश हे दीर्घकाळ यशस्वीरीत्या टिकून राहतं. सुदृढ लोकशाहीसाठी पक्ष आणि संघटनेची उद्दिष्टे मजबूत असावी लागतात. ज्या संघटना आणि पक्ष मूळ उद्दिष्टांशी तडजोड करून वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेला  प्राधान्य देतात त्या पक्ष वा […]

पंचायत ते पार्लियामेंट : सोशल मीडियाच ठरवणार निवडणुकांची दिशा आणि दशा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

कोणत्याही संघटनेचा आणि पक्षाचा मूलमंत्र हा सर्वांना सामावून घेणारा म्हणजेच “सर्व स्मूचय ” असला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे “विभूती पूजन” नसलेल्या संघटनांचे प्रचार, प्रसार आणि यश हे दीर्घकाळ यशस्वीरीत्या टिकून राहतं. सुदृढ लोकशाहीसाठी पक्ष आणि संघटनेची उद्दिष्टे मजबूत असावी लागतात. ज्या संघटना आणि पक्ष मूळ उद्दिष्टांशी तडजोड करून वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेला  प्राधान्य देतात त्या पक्ष वा संघटना मृतप्राय, निष्क्रिय होण्यास वेळ लागत नाही.  मूळ उद्दिष्टांशी कोणतीही तडजोड ना करणाऱ्या संघटना , पक्षांचे स्थान राजकारणात , समाजकारणात वसत्ताकारणात उच्च पदावर पोहचले आहे. सद्य परिस्थितीत सोशल मीडिया हे संघटनेच्या पक्षाच्या उद्दिष्टांना समाजात तळागाळात पोहचवण्याचे अत्यंत प्रभावी साधन बनले आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक आणि प्रभावी वापर करून समाजातील तळागाळातील सोशिक, वंचित समाजाला सत्तेत सक्रिय भागीदारी मिळवून देण्यास मदत होईल.

2008 मध्ये सर्वप्रथम बराक ओबामा यांनी सोशल मीडियाची ताकद आणि प्रभाव दाखवला. फेसबुक, ट्विटर आणि अशाच अनेक माध्यमांनी संयुक्त राष्ट्र निवडणुकांत राष्ट्रपती पद यशस्वीरीत्या खेचून आणले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही सोशल मीडियाच्या ताकदीवर अवघड आणि अनपेक्षित राष्ट्रपती पद एकतर्फा जिंकून आणले. आजच्या तारखेत बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्था प्रत्येक मतदाराचा  ” Psychosomatric Profile  ”  तयार करून निवडणुकांचे प्रचार, प्रसार आणि निकालांवर निर्णायक प्रभाव पाडून जनमत ढवळून काढतात व त्या अनुषंगाने संघटना, पक्ष आपापली धोरणे ठरवतात. ग्राउंड लेवल कार्यकर्ता हा सोशल मीडियाच्या माध्यमाने पक्षाच्या धोरणांशी, पदाधिकाऱ्यांशी कायम स्वरूपी जोड्याल्या जातो व अधिक प्रभावशाली पद्धतीने निवडणुकांमध्ये जनतेशी सर्व स्तरांवर एकरूप होता येईल.  येणाऱ्या काळात निवडणुका मुख्यत्वे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्पुटरवर सोशल मीडियाद्वारे लढवण्यात येतील आणि निर्णय देतील असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

कोणत्याही संघटना वा पक्षाची जिंकण्याची क्षमता ही संपूर्ण संघटनेच्या सामुदायिक सोशल मीडिया फॉलोअर बेसने तपासली गेली पाहिजे.  समाजकारणात, राजकारणात व सत्ताकारणात संघटना, पक्षातील सर्व प्रतिनिधींना म्हणजेच पंचायत ते पार्लियामेंटमध्ये सर्व सदस्यांना वैयक्तिक सोशल मीडिया फॉलोअर बेस निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. याच बेसने प्रतिनिधींना जनतेचा  विश्वास सकारात्मकरित्या प्राप्त करून घेता येईल. सक्रिय, कायमस्वरूपी सोशल मीडिया फॉलोअर बेस हा प्रत्येक प्रतिनिधींना नागरिकांमध्ये घराघरात यशस्वीरित्या पोहोचवून देईल. अशा पद्धतीने जनतेत विश्वास निर्माण केल्यास त्या प्रतिनिधींसह संपूर्ण पक्षाला, संघटनेला सुवर्णकाळ येईल हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे.

केंद्रीय स्तरावर सोशल  मीडिया प्रशिक्षण सेल संघटित करून सर्व प्रतिनिधींना आणि त्यांच्या चमूला त्यात सक्रियरित्या भाग घेण्यास प्रोत्साहित केले गेले पाहिजे. फक्त एका व्यक्तीच्या सोशल मीडिया फॉलोअर बेसच्या आधारे संपूर्ण निवडणुकांच्या परिणामांचे गणित जुळवण्याचा धोका न पत्करता संपूर्ण पक्षाची प्रगल्भता आणि दृढता प्रस्थापित करून वैश्विक सोशल मीडिया फॉलोअर बेस कमावला जाऊ शकतो.  आज तशीच दृढता, प्रगल्भता प्रस्थापित करून शहरापुरता खासदार, गावाकरता आमदार आणि खेड्याकरता सरपंच का नाही कमाऊ शकत? हीच सर्वात मोठी राजकीय शोकांतिका संघटनांनी, पक्षांनी लक्षात घेतली पाहिजे. दुर्दैवाने केंद्रीय स्तरावरचे काही मोजके नेते वगळता प्रदेश, जिल्हा आणि शहर –

तालुका नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींचे सोशल मीडियावर कोणताही कायम स्वरूपी, सक्रीय फॉलोअर बेस दिसत नाही. त्यामुळेच अनेक अस्मानी कर्तृत्व असलेल्या नेत्यांना अजूनही पक्षाला, संघटनांना तळागाळातील समाजाला सत्तेत सक्रिय आणि यशस्वी भागीदारी मिळवून देता आली नाही.

सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरांनी पंचायत ते पार्लियामेंट स्तरावरील प्रत्येक प्रतिनिधींची प्रतिमा बांधणी म्हणजे ” इमेज बिल्डिंग – ब्रांडिंग ” ही सर्वदूर सामान्यातल्या सामान्य नागरिकापर्यंत मूळ उदिष्टांसह स्थापित करता येऊ शकते. प्रत्येक प्रतिनिधींची प्रतिमा, कामांचा आलेख, वचनांची पूर्ती इत्यादी दैनंदिन व  प्रमुख मुद्दे जन सामान्यात अधिक विश्वास निर्माण करतील ज्याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष आणि संघटनेला सर्व स्तरावर होईल. संघटनेच्या मूळ उद्दिष्टांना बगल न देतो सोशल मीडियाचा प्रभावी आणि सकारात्मक वापर लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी फायदेशीर ठरेल यात शंका नाही.

अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक 

(नोट – ब्लॉगमधील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.