Special Report: नवाब मलिक यांचा कंगनाला मलाणा क्रिमवरून टोला; काय आहे मलाणा क्रिम?, कशासाठी होतो वापर?; वाचा सविस्तर

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मलाणा क्रिमवरून अभिनेत्री कंगना रणावतरवर टीका केली. त्यामुळे मलाणा क्रिमची चर्चा सुरू झाली आहे. ही मलाणा क्रिम नक्की काय आहे? या क्रिमचा उपयोग काय होतो?

Special Report: नवाब मलिक यांचा कंगनाला मलाणा क्रिमवरून टोला; काय आहे मलाणा क्रिम?, कशासाठी होतो वापर?; वाचा सविस्तर
Malana Cream
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 1:13 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मलाणा क्रिमवरून अभिनेत्री कंगना रणावतरवर टीका केली. त्यामुळे मलाणा क्रिमची चर्चा सुरू झाली आहे. ही मलाणा क्रिम नक्की काय आहे? या क्रिमचा उपयोग काय होतो? मलिक यांनी या क्रिमवरूनच कंगनाला टोला का लगावला? असे सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या क्रिमचा घेतलेला हा आढावा.

नवाब मलिक काय म्हणाले?

कंगना रणावतने देशाला भीक मागून स्वातंत्र्य मिळाल्याचं म्हटलं होतं. त्यावरून देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कंगनावर जोरदार हल्ला चढवला आहे. 1857 पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री काढून घेतला जावा. या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

मलाणा गावाची कीर्ती देश-विदेशात का?

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मलाणा नवाचं एक छोटसं गाव आहे. गाव छोटसं असलं तरी ते देशविदेशात प्रसिद्ध आहे. या गावातील मलाणा क्रिममुळेच हे गाव प्रसिद्ध झाले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही एनसीबीने 5 किलो मलाणा क्रिम जप्त केली होती. त्यानंतर या क्रिमची अधिक चर्चा सुरू झाली आहे. कंगना रणावत ही हिमाचलची आहे. त्यामुळे तोच धागा पकडून मलिक यांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

मलाणा क्रिम काय आहे?

मलाणा क्रिमला चरस हॅश किंवा हशीश म्हटलं जातं. तिला भांगही म्हटलं जातं. हे अमली पदार्थ वीड किंवा गांजाच्या रोपाच्या माध्यमातून बनवली जातात. या क्रिमचा रंग काळा असतो. त्यामुळे तिला मलाणा क्रिम किंवा ब्लॅक गोल्डही म्हटलं जातं. या गावात नैसर्गिकरित्या वीड उगते. मात्र, बेकायदेशीरपद्धतीनेही वीड उगवले जाते. डोंगराळ भागात अनेक ठिकाणी गांजा, हॅश मिळणं सोपं असतं. पण मलाणा क्रिम मिळणं कठिण असतं. मलाणा गावात जगातील सर्वात चांगलं वीड उगवली जाते असं सांगितलं जातं. आश्चर्य म्हणजे या गावातील लोक चरसला सर्वात पवित्रं जडी-बुटी मानतात.

कशी बनते क्रिम?

हिमाचल प्रदेशातील मलाणा गावात मिळणारी मलाणा क्रिम अत्यंत चांगल्या क्वॉलिटीची असल्याचं मानलं जातं. देशभरात मलाणा क्रिम मिळते. मात्र, मलाणा गवातील क्रिमला अधिक मागणी असल्याचं सांगितलं जातं. मलाणा क्रिम ही कॅनबिसच्या रोपापासून बनवली जाते. मलाणातील लोक हे रोप हाताने रगडून त्याची क्रिम तयार करतात. त्यामुळे ती हॅश क्रिम सारखी दिसते. मात्र, आपल्या देशात अमली पदार्थाचं सेवन करणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा अमलीपदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. अशा प्रकारे अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जाते.

क्रिम खास का?

कॅनबिस रोपांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्वे आढळून येतात. त्याला कॅनाबिनॉयड्स म्हटलं जातं. या रोपांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेटा हायड्रो कॅनाबिनोल आढळून येते. त्यामुळे हाय सेन्सेशनची जाणीव होते. ज्या रोपामध्ये टीएचसीचं प्रमाण कमी असते त्याचा वापर कागद, टेक्स्टाईलसाठी केला जातो. त्याशिवाय ज्या रोपात सीबीडीचं प्रमाण अधिक असेल त्या रोपांचा वापर औषधांसाठी केला जातो. मलाणाच्या चरसमध्ये वेगळाच सुगंध असतो. त्यामुळेच हा परिसर प्रदूषण मुक्त असून या ठिकाणी शुद्ध हवा मिळत असल्याचं सांगितलं जातं.

किंमत काय?

इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार 10 ग्राम मलाणा क्रिमसाठी 1500 ते 8 हजार रुपये आकारले जातात. क्रिमची शुद्धता आणि ती कुठे विकली जाते यावरही या क्रिमची किंमत ठरत असते. ज्या ठिकाणी या क्रिमची मागणी अधिक असते त्या ठिकाणी क्रिमची किंमत अधिक असल्याचं सांगितलं जातं.

मलाणाचा इतिहास काय?

हिमाचल प्रदेशातील मलाणा हे एक छोटसं गाव आहे. या गावाच्या प्राचीन इतिहासानुसार या गावात राहणारे लोक आर्यांचे पूर्वज आहेत. मोगलांच्या काळापासून या लोकांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या ठिकाणी सम्राट अकबरानेही दौरा केला होता. त्यावेळी अकबराने या गावातील लोकांकडून कोणत्याही प्रकारचा कर वसूल करण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. सम्राट अकबराची पूजा केली जाणारं हे एकमेव गाव आहे. काही लोकांच्या मते येथील लोक अलेक्झांडर दी ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहे. या गावाची लोकसंख्या 2500 एवढी आहे.

संबंधित बातम्या:

भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा, लवकरच पुरावे देणार; नवाब मलिकांच्या आरोपांनी खळबळ

अनिल देशमुखांची ईडी कोठडी संपणार, जामीन मिळणार का?

मित्राचा वाढदिवस साजरा करुन घरी परतणाऱ्या 3 तरुणांचा अपघात, डंपरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.