Photo : अभिनेता राहुल वैद्य आणि दिशा परमार विवाह बंधनात?, पाहा फोटो

आता राहुल आणि दिशा या दोघांचं गुपचूप लग्न झाल्याचे समोर येते आहे. लग्नाचा व्हिडीओही समोर आला असून तो खूप व्हायरलही होत आहे. (Actor Rahul Vaidya and Disha Parmar got married !, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:41 AM, 10 Apr 2021
1/7
Rahul Vaidya Wedding
‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) फेम गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू होती. ‘बिग बॉस 14’च्या घरात राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते.
2/7
Rahul Vaidya Wedding
आता दोघांचेही गुपचूप लग्न झाल्याचे समोर येते आहे. लग्नाचा व्हिडीओही समोर आला असून तो खूप व्हायरलही होत आहे. काही दिवसांपूर्वी या लग्नाची काही छायाचित्रेही समोर आली होती. यावरून दोघे विवाहबंधनात अडकले आहेत, असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात होता.
3/7
Rahul Vaidya Wedding
दरम्यानच्या काळात दोघांनीही त्यांच्या सीक्रेट वेडिंगचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो त्यांच्या नवीन म्युझिक अल्बममधला आहे .
4/7
Rahul Vaidya
व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झालेले चाहते आता या दोघांचेही अभिनंदन करत आहेत. राहुल वैद्य आणि दिशा यांनी आपापल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून फोटो पोस्ट शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिले की, ‘न्यू बिगनिंग’. टीव्ही इंडस्ट्रीचे स्टार्स या जोडीला खूप शुभेच्छा देत आहेत.
5/7
Rahul Vaidya
त्याच वेळी, बरेच चाहते कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की, हे लग्न कधी झाले? दोघांनी फोटो पोस्ट केल्यानंतरही चाहत्यांना असे वाटते आहे की, हे फोटो खरे नाहीत, तर एखाद्या शूटिंग दरम्यानचे आहेत आणि चाहत्यांचा अंदाज खरा ठरला आहे.
6/7
Rahul Vaidya
हा व्हिडीओ राहुलच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. तसेच, राहुल वैद्य आणि दिशा परमार लवकरच एकत्र एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार असल्याचे म्हटले गेले आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की, हा व्हिडीओ त्याच शूटिंग दरम्यानचा आहे. तसेच, या व्हिडीओचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. ही जोडी लवकरच एका नव्या गाण्यात एकत्र झळकणार आहे
7/7
Rahul Vaidya
गायक राहुल वैद्य यांने दिशा परमारला ‘बिग बॉस 14’च्या घरात, नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज केले होते. यानंतर दिशा परमार त्याला भेटायला आली होती आणि याचवेळी तिने राहुलचा प्रस्ताव देखील मान्य केला होता. दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दिशा परमारही राहुलच्या कुटुंबियांची खूप लाडकी आहे. ‘आम्हाला लग्न करायचे आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता इतक्यात मुहूर्त शोधणं योग्य नाही. त्यामुळे आम्ही वाट बघू’, असे राहुलने म्हटले आहे.