PHOTO | ‘गुरूपर्व’च्या निमित्ताने अभिनेत्री पूजा हेगडेची गुरुद्वाराला भेट, पाहा खास फोटो

आज (30 नोव्हेंबर) देशभरात ‘गुरूपर्व’ साजरे होत आहे. या खास दिवशी, प्रत्येकजण एकमेकांचे अभिनंदन करत आहे. अभिनेत्री पूजा हेगडे देखील गुरुउत्सवाच्या निमित्त साधत गुरुद्वारामध्ये पोहोचली होती.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:50 PM, 30 Nov 2020
आज (30 नोव्हेंबर) देशभरात ‘गुरूपर्व’ साजरे होत आहे. या खास दिवशी, प्रत्येकजण एकमेकांचे अभिनंदन करत आहे.
अभिनेत्री पूजा हेगडे देखील गुरु उत्सवाचं निमित्त साधत गुरुद्वारामध्ये पोहोचली होती.
यादरम्यान अभिनेत्री पूजा हेगडेने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती.
यावेळी पूजा हेगडेने गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली. कुठलाही भडक मेकअप न करता साध्या वेशात ती प्रार्थनेसाठी रवाना झाली होती.
लवकरच पूजा हेगडे ‘बाहुबली’ फेम प्रभाससह ‘राध्येशाम’ या चित्रपटात झळकणार आहे.