लखनौ सुपर जायंट्सच्या कालच्या पराभवासाठी केएल राहुलला जबाबदार धरण्यात येत आहे. कारण डेथ ओव्हर्समध्ये त्याने फिरकी गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला.
2 / 7
रवी बिश्नोई पंजाब किंग्सकडून खेळायचा, पण लखनौ सुपर जायंट्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यावर एका युजरने अनिल कुंबळेचा फोटो पोस्ट करुन हे टि्वट केलं आहे. तुम्ही माझ्याकडून रवी बिश्नोईला घेतलं. मी गुजरात टायटन्सला मोहम्मद शमीची शिफारस केली, कसा वाटला माझा मॉन्स्टर स्ट्रोक, अशी कॅप्शन या फोटोला दिली.
3 / 7
राहुल तेवतियाने केएल राहुलला नेहमीच सतवलं आहे. राहुल खेळत असलेल्या संघावर तो नेहमी भारी पडतो. याआधी सुद्धा आपण पाहिलय आणि काल सुद्धा हेच दिसलं, असं एका टि्वटर युजरने म्हटलं आहे.
4 / 7
दुष्मंथा चामीरा आणि आवेश खानची दोन-दोन षटक बाकी असताना दीपक हुड्डाच्या हातात चेंडू का सोपवला? त्यासाठी लखनौचे चाहते उद्या सकाळी राहुलच्या घरावर मोर्चा घेऊन जाणार आहेत, असं दाखवणारा एक गंमतीशीर फोटो एका युजरने पोस्ट केलं आहे.
5 / 7
क्रिकेटच शून्य ज्ञान असलेले काहीजण अजूनही केएल राहुल भारताचा भविष्यातील कॅप्टन असल्याचं बोलत आहेत. या पनोतीपेक्षा ऋषभ पंत, श्रेयस अय्यर कॅप्टन म्हणून दहापट चांगले आहेत. हा कॅप्टन झाला, तर लोक क्रिकेट पहायचं बंद करतील कबीर नावाच्या टि्वटर युजरने अशी संतप्त कमेंट केली आहे.
6 / 7
काल ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला. त्यावेळी स्टेजवर तिथे एक विचित्र प्रसंग घडला. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या कानाखाली मारली. केएल राहुलच्या कॅप्टनसीचं वर्णन करण्यासाठी तोच फोटो वापरण्यात आला आहे.